Anganwadi worker : महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड;

A gift of Rs 2,000 will be deposited in the account of Bhaubija : खात्यात जमा होणार २ हजारांची भाऊबीज भेट

Mumbai : यंदाच्या दिवाळीत राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारी बातमी आहे. महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी २ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयासाठी शासनाने ४०.६१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर झाला असून, ही रक्कम नवी मुंबई येथील आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

Demand loan waiver : शेतकरी उद्ध्वस्त; पीएम केअर फंडातून कर्जमाफीची मागणी !

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, “अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिला व बालकांच्या पोषण, संगोपन आणि सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान देतात. त्यांच्या कष्टांचा सन्मान आणि सणाच्या उत्साहात भर घालण्यासाठीच शासनाने ही भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.”

Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाने कृषी अधिकाऱ्याच्या अंगावर फेकली सडकी झाडे

तटकरे पुढे म्हणाल्या की, “अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या खऱ्या अर्थाने समाजातील ‘शक्ती’ आहेत. त्यांचा दिवाळीचा सण उत्साहात आणि आनंदाने साजरा व्हावा, हीच आमची इच्छा आहे.”

या निर्णयामुळे राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी गोड आणि संस्मरणीय होणार आहे. शासनाकडून मिळालेली ही भाऊबीज भेट त्यांच्या परिश्रमांचे कौतुक करणारी ठरणार आहे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

_____