Former Home minister demand Macoca on Walmik Karad : राज्य सरकारवर सोडले टीकास्त्र
Nagpur बीड येथील सरपंच हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सरपंच हत्येचा कराड हाच मास्टर माईंड आहे. त्याच्यावर मकोका का लावला जात नाही, असा थेट सवाल माजी गृहमंत्र्यांनी विद्यमान गृहमंत्र्यांना विचारला आहे.
विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख यांनी मुलासाठी माघार घेतली होती. काटोल मतदारसंघातून त्यांचे सुपूत्र सलील देशमुख यांनी नशीब आजमावले होते. पण, भाजपचे चरणसिंग ठाकूर यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर सलील देशमुख सध्या बॅकफुटवर आहेत. पण अनिल देशमुख पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यांनी आता वाल्मिक कराड प्रकरणात सरकारला धारेवर धरले आहे. त्यांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जाणारे मुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी थेट प्रश्न केला आहे.
Appointment of Guardian Minister : पालकमंत्र्यांसाठी प्रदेशाध्यक्षांची ‘तारीख पे तारीख’
वाल्मिक कराड हा मास्टर माईंड असतानाही सरकार त्याला वाचविण्याचे प्रयत्न करत आहे. जर कठोर कारवाईच्या वल्गना करण्यात येत आहेत. तर मग त्याच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई का करण्यात येत नाही, असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला आहे. नागपुरात आज १३ जानेवारीला ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Mahavitaran formed teams : वीज चोरी करणाऱ्यांची काही खैर नाही
बीड, परभणी येथील घटना दुर्दैवी आहे. या घटनांमध्ये जे दोषी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी जनतेची मागणी आहे. मात्र सरकार आरोपींना वाचवत आहे. या प्रकरणात मंत्र्यांचा राजीनामा घायवा की नाही हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. मात्र एसआयटीवर देशमुख यांच्या कुटुंबियांना आक्षेप घेतला आहे. या प्रकरणाची नि:ष्पक्षपणे चौकशी व्हायला हवी, असे देशमुख म्हणाले. महाविकास आघाडीबाबतदेखील त्यांनी भाष्य केले.
दिल्लीत आमनेसामने, तरीही एकत्र
मविआ एकमेकांविरुद्ध दिल्लीत लढत असल्याने तसे वक्तव्य देण्यात आले. राज्यात महाविकास आघाडी एकत्र आहे, निवडणूकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात. मोठ्या निवडणुका होतात तेव्हा महाविकास आघाडी सोबतच असेल, असे देशमुख यांनी सांगितले.