Rohit Pawar’s sarcastic criticism, Anjali Damini replies to Damania’s reply : रोहित पवारांची उपरोधिक टीका, अंजली दमानियांचे पण प्रत्युत्तर
Mumbai : सामाजिक कार्यकर्त्या आणि भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांची महाराष्ट्र सरकारच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ मित्रा या महत्त्वाच्या संस्थेवर मानद सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शाश्वत विकासासाठी धोरण आखणे आणि मार्गदर्शन करण्यासाठी या संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
अनिश दमानिया यांच्या या नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कारण अंजली दमानिया विविध राजकीय नेते, मंत्री आणि माजी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना, त्यांच्या पतीची मुख्यमंत्री यांच्या अधिपत्याखालील संस्थेत नियुक्ती झाल्यामुळे विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Cancer treatment : प्रत्येक जिल्ह्यात समग्र कर्करोग उपचार सेवा !
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रोहित पवार यांनी या घडामोडीवर उपरोधिक टीका केली. “महाराष्ट्र सरकारची थिंक टँक असलेल्या ‘मित्रा’ या संस्थेवर मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन. एकीकडे अंजली दमानिया भ्रष्टाचाराविरोधात काम करतात, तर आता अनिश दमानिया आर्थिक विकासाच्या क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन करणार आहेत. दमानिया कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील समन्वय निश्चितच महत्त्वाचा ठरेल,” असे रोहित पवार यांनी म्हटले.
Sudhir Mungantiwar ; ‘केशवा… माधवा…’ आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वरांनी भारावले भजनी
या टीकेला उत्तर देताना अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर परखड प्रतिक्रिया दिली. “रोहित पवार यांचा संदेश वाचल्यावर मला वाईट वाटले नाही. हे तर अपेक्षितच होते. अनिश हा ‘एफआयसीसीआय’चा सभासद आहे आणि ऑफिसमधील तिसरा व्यक्ती आहे ज्याला ‘मित्रा’वर मानद सल्लागार म्हणून घेतले आहे. या पदासाठी तो कोणतेही मानधन घेणार नाही. त्याचा ना राजकारणाशी, ना सरकारशी काहीही संबंध आहे. त्यालाही देशासाठी आपले योगदान द्यायचे आहे. हे वृत्त आम्ही दोघांनीही स्वतः समाज माध्यमांवर प्रसारित केले आहे. यात लपवण्यासारखे काहीच नाही, उलट मला त्याचा खूप अभिमान आहे,” असे त्या म्हणाल्या.
या नियुक्तीवरून राजकारणात नवे समीकरण तयार होत असताना, दमानिया दांपत्याचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.








