Anna Bhau Sathe social forum : संस्था राजकीय होतेय म्हणत अध्यक्षांसह अनेकांचे राजीनामे

Many executives resign, alleging that the organization is becoming political : अण्णाभाऊ साठे सोशल फोरममधील घटनेने खळबळ

Lonar अण्णा भाऊ साठे महाराष्ट्र राज्य सोशल फोरममध्ये मोठी खळबळ उडाली असून, संस्थेचे प्रदेशाध्यक्ष साहेबराव पाटोळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. संस्थेचे कार्य राजकीय दिशेने वळत असल्याचा ठपका ठेवत त्यांनी ही कारवाई केली आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय अंभोरे यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत, तसेच त्यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे फोरमला राजकीय कलाटणी मिळत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळेच हे राजीनामे दिल्याचे समजते.

राजीनामा देणाऱ्यांमध्ये सल्लागार ज्ञानदेव मानवतकर, विदर्भ सरचिटणीस वामनराव गुडेवार, संघटक भगवान गायकवाड, उपाध्यक्ष भास्कर आगाम, कार्याध्यक्ष गजानन सोनोने, देविदास फुटवाईक, कृष्णा नाटेकर, मनीष पाटोळे, उमेश बाभुळकर, दत्तात्रय बोरक, गजानन साठे, संतोष तिरेराव, संदीप डाखोडे, सीताराम इंगळे, महादेवराव ढगे, सुधाकर वानखेडे आदींचा समावेश आहे.

Nitesh Rane : तो मदरसा बुलढाण्यात नाहीच, नितेश राणेंचा दावा चुकीचा!

 

विशेष म्हणजे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्याच दिवशी हे राजीनामे सादर झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात चर्चा आणि खळबळ उडाली आहे.

ladki bahin yojna : गाड्या बंगले असणाऱ्यांनी योजनेतून स्वतःहून बाहेर पडावे !

चांगल्या संस्थांचे नुकसान
गेल्या काही वर्षांमध्ये प्रत्येक संस्थांमध्ये टोकाची राजकीय भूमिका घेणारे लोक तयार झाले आहेत. यात बरेचदा दोन भिन्न विचारांचे पदाधिकारी एकमेकांशी वाद घालताना दिसतात. अनेक संस्थांचे काम तर केवळ राजकीय हाणामारीमुळेच बंद पडले किंवा थांबलेले आहे. अशात एका चांगल्या संस्थेने राजकीय वादामुळे नुकसान होणे वेदनादायी असल्याची भावना व्यक्त होत आहे.