Anti curroption bureau: तहसीलदाराला दाेन लाखांची लाच घेताना पकडले, शंका येताच पैसे फेकले शाैचालयात

 

Tehsildar caught taking a bribe of two lakh : अकाेल्याच्या एसीबी पथकाची बुलढाण्यात कारवाई, शेतजमीनीचा वर्ग बदलण्यासाठी मागितले एकरी ५० हजारांची लाच

Buldhana शेतजमीनीचा वर्ग बदलण्यासाठी दाेन लाख रुपयांची लाच घेतांना माेताळ्याचे तहसीलदार हेमंत भागवत पाटील यांना अकाेल्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)पथकाने १४ सप्टेंबर राेजी रंगेहाथ पकडले. बुलढाणा शहरातील लक्ष्मीनगर स्थिती पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या कारवाईमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.पैसे घेतल्यानंतर शंका आल्याने पाटील यांनी स्विकारलेले पैसे शाैचालयात फेकले हाेते. मात्र, पथकाने ती रक्कम जप्त करण्यात यश मिळवले आहे.
तक्रारीनुसार, तक्रारदाराच्या मामाकडील थड येथील गट क्रमांक २३ मधील १.६२ हे.आर. शेतजमीन भोगवटादार वर्ग २ मधून वर्ग १ करण्यासाठी तहसिलदार पाटील यांनी प्रति एकर ५० हजार रुपये अशी एकूण ४ एकरासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी ३ सप्टेंबर रोजी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती.

Rising Mining Activities : माओवाद आटोक्यात, पण पर्यावरणाचे काय ?

त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यानही तहसिलदार पाटील यांनी लाच मागितल्याचे पंचासमक्ष स्पष्ट झाले. त्यानंतर रविवारी दुपारी एसीबीने रचलेल्या सापळा कारवाईत त्यांनी तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची रक्कम स्वीकारली. मात्र संशय आल्याने पाटील यांनी ती रक्कम त्यांच्या घराच्या शौचालयात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तरीही एसीबी पथकाने ती रक्कम जप्त केली.

Vidarbha Farmers : थर्माकोलवरून चालत नदी पार करतात शेतकरी!

 

या कारवाईत एसीबीच्या अमरावती विभागाचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक सविंद्र शिंदे, अकाेल्याचे उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल इंगोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.