Farmers cross the river by walking on thermocol : देवखेड शेतकऱ्यांचा संताप उसळला,जलसमाधी आंदोलनाचा इशारा
Dusarbid देवखेड येथील खडकपूर्णा नदीवर सुरू असलेले पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेतच थांबले आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मार्ग उपलब्ध नाही. या गंभीर प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर २० सप्टेंबरपर्यंत पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अन्यथा नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन करू, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी दिला आहे.
२०१८ मध्ये तत्कालीन आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नातून हा महत्त्वाचा पूल मंजूर झाला होता. हा पूल विदर्भ आणि मराठवाडा जोडणारा असल्याने त्याला धोरणात्मक महत्त्व आहे. मात्र, निधीअभावी केवळ ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित दहा टक्के काम अद्याप रखडले आहे. याचा थेट फटका देवखेड गावातील ३० ते ३५ शेतकऱ्यांना बसत आहे.
Food Security Scheme : ३१७८ लाभार्थ्यांचे १६९ क्विंटल धान्य फस्त केले!
या शेतकऱ्यांची शेती नदीच्या दुसऱ्या बाजूला असून, शेतात जाण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध नाही. काही शेतकरी धोकादायक पद्धतीने थर्माकोलचा आधार घेऊन नदी पार करत आहेत. सध्या सोयाबीन आणि कपाशीचे पीक काढणीस सज्ज आहे, मात्र मार्ग नसल्यामुळे पीक घरापर्यंत आणणे अशक्य झाले आहे.
या संदर्भात शेतकऱ्यांनी सिंदखेडराजा तहसीलदार तसेच देऊळगाव राजा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना निवेदन दिले आहे. जर पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला नाही, तर संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
Starvation issue : थकीत मानधनासाठी ग्रामरोजगार सहाय्यक आक्रमक
या निवेदनावर सहदेव लाड यांच्यासह अनिल लांडगे, काशिनाथ सरकटे, कल्याण आढाव, अमोल पाडमुख, रेखा आढाव, जया खरात आदींसह चाळीसहून अधिक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








