Arvind Sawant : थापाड्या सरकारला शेतकऱ्यांचा कंटाळा, अरविंद सावंतांची टीका

Instructions to Strengthen the Organization : शाखानिहाय बांधणी घट्ट करण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

Shegao राज्यातील महायुती सरकारवर हल्लाबोल करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत यांनी शाखानिहाय संघटनात्मक बांधणी घट्ट करा आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा, अश्या सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या.

शेगाव येथील विश्रामभवनात सातही विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आढावा घेतला. सुमारे पाच तास चाललेल्या या बैठकीत संघटनात्मक बळकटी, शेतकरी प्रश्न आणि जनतेतील असंतोष यावर सविस्तर चर्चा झाली.

March by the United Tribal Community : आरक्षणाच्या रक्षणासाठी आदिवासींचा एल्गार!

सावंत म्हणाले, “शेती आणि मातीच्या प्रश्नांवर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. हे सरकार म्हणजे फक्त थापाड्या सरकार! उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी दिली होती. आज पुन्हा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तोच लढा बुलंद करण्याची गरज आहे.”

सावंत म्हणाले, पक्षाची खरी ताकद कार्यकर्त्यांमध्ये आहे. प्रत्येक शाखा, विभाग आणि तालुका पातळीवर संघटनात्मक बांधणी मजबूत करावी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भगवा फडकवण्यासाठी जोमाने कामाला लागा.

Local Body Election : ११ नगर परिषदांच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा मुहूर्त निघाला!

या बैठकीला उपनेते आमदार नितीन देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, गजानन वाघ, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, डी. एस. लहाने, जिल्हा संघटक गोपाल बच्छिरे, अॅड. सुमित सरदार, महिला आघाडी जिल्हा संघटिका चंदाताई बढे, विजयाताई खडसन, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, प्रा. आशिष रहाटे, गजानन धांडे, तसेच तालुका प्रमुख, विभागप्रमुख, महिला आघाडी, शहरप्रमुख आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.