Whether Shivsena is goinn to Contest with MVA or Not : अरविंद सावंत यांच्या भूमिकेमुळे स्थानिक पदाधिकारी संभ्रमात
Amravati आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढायच्या की स्वबळावर, याचा निर्णय आता स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आला आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले. एकीकडे राज्यातील काही महानगरपालिकांमध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अमरावतीत मात्र वेगळी भूमिका घेतल्याने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
अमरावतीतील शिवसेना उबाठा गटाच्या आढावा बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. निवडणुकीपूर्व तयारी आणि स्थानिक समीकरणांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, “स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यावा. पक्षाची विचारधारा आणि जनतेचा विश्वास या दोन्हीला प्राधान्य द्यावे,” असे आवाहन सावंत यांनी केले.
Local Body Elections : महानगरपालिकेत ‘महिलाराज’; आरक्षणाने काहींना ‘दे धक्का’
बैठकीदरम्यान दर्यापूर व अंजनगाव सुर्जी भागात काँग्रेस आणि मनसेसोबत प्राथमिक चर्चा सुरू असल्याची माहिती काही पदाधिकाऱ्यांनी दिली. सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका लक्षात घेऊन खा. सावंत यांनी प्रत्येक तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला.
Amol Mitkari : “हकालपट्टी नाही, अजित दादांचा कार्यकर्ता असणेच माझं पद”
या बैठकीला माजी खासदार अनंत गुढे, जिल्हाप्रमुख पराग गुडधे, आमदार गजानन लवटे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे, तसेच शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती अवघड आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.








