Asaduddin Owaisi : खा. असदुद्दीन ओवेसी कोल्हापूर दौऱ्यावर, वातावरण तापले !

Strong opposition from Hindutva organizations : हिंदुत्ववादी संघटनांचा पुन्हा कडाडून विरोध

Kolhapur : एआयएमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात कोल्हापुरातील बागल चौक येथे पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन, पत्रकार परिषद तसेच इचलकरंजी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या संपूर्ण दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला असून वातावरण तापले आहे.

ओवेसी यांच्या कार्यक्रमांदरम्यान ते भडकाऊ भाषण करतात, असा आरोप करत नवरात्र उत्सवाच्या काळात त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी मागणी स्थानिक संघटनांनी केली आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांकडून बागल चौक परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Harshawardhan Sapkal : रावणासारखीच संघाची दहा तोंडे !

ओवेसी यांचा कोल्हापूर दौरा याआधीही वादग्रस्त ठरला होता. विशाळगड दंगलीनंतर त्यांचा नियोजित दौरा कडाडून विरोधामुळे रद्द करण्यात आला होता. यावेळी मात्र पक्षाचे कार्यालय सुरू होणार असून, इचलकरंजीतील सभेमुळे विरोध अधिक तीव्र झालेला दिसत आहे.

Shivsena Leader : प्रश्न विचारले तरी सरकारला झोंबतात !

राजकीय पातळीवर पाहता, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमने १६ जागांवर उमेदवार दिले होते, त्यापैकी फक्त एक जागा पक्षाच्या खात्यात गेली. पक्षाने लढवलेल्या उमेदवारांपैकी बहुतांश मुस्लिम आणि काही दलित होते. मात्र, या उमेदवारांमुळे काही ठिकाणी महाविकास आघाडीचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धुळे, मानखुर्द-शिवाजी नगर अशा मतदारसंघांमध्ये एआयएमआयएमचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर काही ठिकाणी भाजप किंवा शिंदे गटाच्या उमेदवारांच्या विजयाचा फरक कमी करण्यात त्यांचा प्रभाव दिसून आला.

त्यामुळे, ओवेसींच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे एकीकडे हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध आणि दुसरीकडे एआयएमआयएमच्या संघटनात्मक विस्ताराचा प्रयत्न यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

____