व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Asha bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन; भारतीय संगीतविश्वावर शोककळा

Asha bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन; भारतीय संगीतविश्वावर शोककळा

veteran-singer-asha-bhosle-passes-away-at-92-indian-music-industry-mourns : ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mumbai : भारतीय संगीतसृष्टीतील ज्येष्ठ आणि बहुआयामी गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आणि हिंदीसह विविध भारतीय भाषांमध्ये असंख्य अजरामर गाणी दिली.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या लहान भगिनी असलेल्या आशा भोसले यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात वर्सटाईल गायिका म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या गायकीत विविधतेचा अनोखा संगम दिसून येत होता. रोमँटिक, गझल, कॅबरे, भक्तीगीत अशा विविध प्रकारच्या गाण्यांमध्ये त्यांनी आपली खास छाप पाडली.

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकार आर. डी. बर्मन, ओ. पी. नैय्यर, सचिन देव बर्मन आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली. ‘दम मारो दम’ आणि ‘ओम शांती ओम’ यांसारखी गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

Cm relief fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन

आशा भोसले यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी दिली. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन सोमवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत ठेवण्यात येणार असून त्यानंतर अंत्ययात्रा निघणार आहे. सायंकाळी चार वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना छातीचा संसर्ग आणि अशक्तपणाचा त्रास होता. त्यांच्या नात जनाई भोसले हिने सोशल मीडियावरून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती आणि उपचार सुरू असल्याचे सांगितले होते.

Ashok kharat case : नाशिक-शिर्डी-पुण्यानंतर सोलापुरातही गुंतवणूक

आशा भोसले यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीतील एक युग संपल्याची भावना व्यक्त केली जात असून त्यांच्या आवाजातील जादू आणि त्यांनी दिलेली गाणी आगामी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी ठरणार आहेत.

error: Content is protected !!