Ashish Jaiswal : शेतकरी आत्महत्यांचा आकडा शुन्यावर नेऊ !

Farmer Suicides Will Be Brought to Nil : शेतकऱ्यांच्या तक्रारींसंदर्भात प्रशासनाला सुचना

Nagpur : राज्यावर शेतकरी आत्महत्याचे संकट मोठ्या प्रमाणावर आले आहे. शेतकरी आत्महत्यांचा आकडा शुन्यावर नेण्यासाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून सरकार अनेक योजना राबवत आहे. नुकसान भरपाईची जी प्रचलित पद्धत आहे, त्यानुसार जे काही शेतकऱ्यांचे नुकसान होते, त्यात एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत केली जाते. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी सरकारचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत, असे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना अॅड. जयस्वाल म्हणाले, सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव होतो आहे. त्या संदर्भात विभागाला अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यासंदर्भात आम्ही प्रशासनाला सुचना केल्या आहेत. आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे सुरू आहे. भविष्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा कमी झाला तरी पुढे हा आकडा शुन्यावर नेण्यात सरकारला यश येईल. यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनही कामाला लागले आहे.

New India : हा नवा भारत आहे, घरात घुसून मारतो !

रामटेकमध्ये चित्रनगरी उभारण्याच्या संदर्भात ज्या हालचाली सुरू आहेत, त्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, महाराष्ट्रात मुंबई आणि कोल्हापूरला चित्रनगरी आहे. आता विदर्भात रामटेकमध्ये चित्रनगरी उभारली जाणार आहे. विदर्भातील कलाकारांसाठी मोठे दालन खुले होणार आहे. ज्यांना सांगित क्षेत्रात काम करायचे आहे, टेलीफिल्मस, डॉक्युमेंटरी तयार करायच्या आहेत, त्यांच्यासाठी ही मोठी सुविधा निर्माण होणार आहे.

Kunbi certificate : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू

रामटेकमध्ये चित्रनगरी व्हावी, यासाठी सरकारचे आधीपासूनच प्रयत्न सुरू होते. तसा जीआरदेखील यापूर्वीच काढलेला आहे. फिल्म सिटीसोबत एंटरटेंटमेंट सिटी कशा पद्धतीने तयार करता येईल, त्याला व्हायबल कसे करता येईल, यावर काम सुरू आहे. नुकतीच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रामटेकमध्ये जागेची पाहणी केली आहे, असेही आशिष जयस्वाल यांनी सांगितले.