व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Ashok kharat case : नाशिक भोंदूबाबा प्रकरणात अशोक खरातला न्यायालयीन कोठडी

Ashok kharat case : नाशिक भोंदूबाबा प्रकरणात अशोक खरातला न्यायालयीन कोठडी

ashok-kharat-nashik-case-judicial-custody-court-hearing-update-marathi-news : उद्या पुन्हा कोर्टात हजर करण्याचे आदेश

Nashik : नाशिकमधील चर्चित भोंदूबाबा प्रकरणात आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक जिल्हा सत्र न्यायालय येथे झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायमूर्ती बी. एन. ईचपुराणी यांच्या समोर ही सुनावणी पार पडली. आरोपीच्या बाजूने वकील सचिन भाटे उपस्थित होते, तर सरकारी पक्षाकडून वकील शैलेंद्र बागडे यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणाचे तपास अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी देखील न्यायालयात उपस्थित होते.

Iran war update : ट्रम्प म्हणतात, पाकिस्तानने केली होती युद्ध थांबवण्याची विनंती !

सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीची प्राथमिक चौकशी केली. यावेळी दुसऱ्या गुन्ह्यात अशोक खरातला न्यायालयीन कोठडी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे त्याला मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात येणार असून तेथून पुढील तपासासाठी विशेष तपास पथकाकडून त्याचा ताबा घेण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

तसेच, तिसऱ्या गुन्ह्यात आरोपीचा ताबा मिळवण्यासाठी दाखल करण्यात आलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी तपास यंत्रणेला आरोपीचा ताबा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने आरोपीला उद्या पुन्हा हजर करण्याचे आदेश दिल्याने या प्रकरणातील पुढील घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

Salil deshmukh : शेतकरी आंदोलनातील गुन्ह्यातून सलील देशमुख निर्दोष मुक्त; राजकीय पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष

सुनावणीनंतर सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी सांगितले की, आरोपीविरोधात विविध गुन्हे नोंद असून न्यायालयाने आज न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच तिसऱ्या गुन्ह्यातील ताब्यासाठीचा अर्जही मंजूर करण्यात आला असून उद्या पुन्हा आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

या प्रकरणात अनेक गंभीर आरोप समोर येत असल्याने तपास यंत्रणा अधिक सतर्क झाली असून पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!