ashok-kharat-nashik-crime-case-wife-absconding-son-in-custody-sit-investigation-court-hearing : अशोक खरातची आज कोर्टात हजेरी, एसआयटी चौकशीचा वेग वाढला
नाशिक : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात गेल्या काही तासांत नाट्यमय घडामोडी घडल्या असून आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याची पोलीस कोठडी संपत असल्यामुळे विशेष तपास पथकाकडून कोठडी वाढवून घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान, खरातविरोधात नव्या तक्रारींचा भडिमार सुरूच असून लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि इतर गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.
काल रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात मोठ्या हालचाली झाल्या. शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरात याच्यासह त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र एसआयटीचे पथक घरावर पोहोचण्यापूर्वीच कल्पना खरात फरार झाल्याची माहिती समोर आली. याचवेळी पोलिसांनी खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला घरातून ताब्यात घेतले असून त्याचीही चौकशी सुरू आहे.
America israel iran war : इराणची गुगल ते टेस्ला सारख्या अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांना थेट धमकी !
तपासात सहकार्य न केल्यामुळे आता पोलिसांनी वेगळी रणनीती अवलंबली असून अशोक खरातसमोरच त्याच्या मुलाची चौकशी करण्याची तयारी सुरू आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि फरार असलेल्या पत्नीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी ही पद्धत वापरण्यात येत असल्याचे समजते. तपास यंत्रणांना अपेक्षित माहिती न मिळाल्यामुळे चौकशी अधिक कडक करण्यात आली आहे.
दरम्यान, एसआयटीकडून या प्रकरणातील आर्थिक आणि धार्मिक अंगांचाही सखोल तपास सुरू आहे. खरातचा चार्टर्ड अकाउंटंट, ईशान्यश्वर मंदिराचा पुजारी तसेच एका सराफ व्यावसायिकाची कसून चौकशी करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहार, मंदिरातील हालचाली आणि गुंतवणुकींचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज न्यायालयात हजर करताना एसआयटीकडून महत्त्वाचे पुरावे सादर केले जाणार असून पुन्हा पोलीस कोठडी मिळवण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे.
याच दरम्यान, तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरात याने कोट्यवधींची संपत्ती उभी केल्याचे निष्पन्न होत असून पुण्यातील मॉडेल कॉलनी भागात त्याच्या मुलीच्या नावावर आलिशान फ्लॅट असल्याचे उघड झाले आहे. २०२३ साली खरेदी करण्यात आलेल्या या मालमत्तेसाठी मोठ्या प्रमाणावर रोख व्यवहार झाल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. याशिवाय इतर शहरांमध्येही त्याची मालमत्ता असल्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहे.
Ready Reckoner Rate : राज्यातील घर खरेदीदारांना मोठा दिलासा; ‘रेडी रेकनर’ जैसे थे
सध्या अशोक खरात याची गेल्या अनेक दिवसांपासून कसून चौकशी सुरू असून महिलांचे लैंगिक शोषण कशा पद्धतीने केले जात होते, याबाबत अनेक धक्कादायक तपशील उघड होत आहेत. तसेच काही राजकीय व्यक्तींशीही त्याचे संबंध असल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








