व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Ashok Kharat case : अशोक खरातशी कुणी कुणी संपर्क केला त्यांची चौकशी...

Ashok Kharat case : अशोक खरातशी कुणी कुणी संपर्क केला त्यांची चौकशी करा; सुबोध सावजींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Demand for an inquiry into who all were in contact with Ashok Kharat : दमानियांना सीडीआर कसे मिळाले?, संभाषण तपासून जाहीर करण्याची मागणी

Dongao अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारणात नवे प्रश्न उपस्थित होत असून, माजी राज्यमंत्री सुबोधभाऊ सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली आहे. समाजसेविका अंजली दमानिया यांना सीडीआर कसे मिळाले, याची चौकशी करण्यापेक्षा अशोक खरात आणि संबंधित व्यक्तींमध्ये नेमके कोणते संभाषण झाले, ते तपासून जाहीर करावे, अशी मागणी सावजी यांनी केली आहे.

आपल्या निवेदनात सावजी यांनी म्हटले आहे की, अशोक खरात यांच्यावरील चौकशी सुरू असताना त्याचे नेमके कोणकोणाशी संबंध होते, त्याला कोणाची साथ होती आणि विविध स्तरांवरील संपर्क कुठपर्यंत पोहोचले होते, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. अंजली दमानिया यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणांना महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात. त्यामुळे सीडीआर कसा मिळाला यापेक्षा त्या आधारे समोर आलेल्या संभाषणांचा तपास अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांनी माफी मागितली नाही तर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

सावजी यांनी या पत्रातून तपासाचा रोख मोठ्या सूत्रधारांकडे वळवण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्यांच्या मते, या सीडीआरमधून अनेक महत्त्वाचे ‘बडे मासे’ गळाला लागण्याची शक्यता असून, प्रकरणातील खरे सूत्रधार समोर येऊ शकतात. अशा परिस्थितीत केवळ माहिती मिळवण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करून मूळ तपास भरकटवला जाऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.

Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळांनी ताणून धरलं, पण पदरात पडलं तरी काय?

यासोबतच सावजी यांनी राजकीय स्तरावर गंभीर सवाल उपस्थित केला आहे. मंत्रिमंडळातील काही बड्या नेत्यांची नावे या तपासात समोर येण्याची शक्यता असल्यानेच तपासाचा फोकस अंजली दमानिया यांच्यावर वळवला जात आहे का?, असा थेट प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. जर तसे असेल, तर हे सत्ताधारी नेतृत्व मोठ्या नेत्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न असल्याची शंका निर्माण होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

error: Content is protected !!