Satyapal maharaj targets political leaders involved in ashok kharat case : राजकीय पुढारी कान असून बहिरे आणि डोळे असून आंधळे झाले आहेत
Akola नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात अंधश्रद्धा आणि राजकीय संगनमताचा मुद्दा ऐरणीवर आला असताना, समाजसुधारक सत्यपाल महाराज यांनी नेत्यांवर हलक्या-फुलक्या शैलीत पण तिखट शब्दांत निशाणा साधला आहे.
“मोठ्या-मोठ्या महाराजांच्या मागे पुढारीच असतात आणि त्यांनाच खतपाणी घालतात,” असे सांगताना त्यांनी नेत्यांच्या ‘आध्यात्मिक राजकारणा’वर उपरोधिक टीका केली. “कान असून बहिरे आणि डोळे असून आंधळे झाले आहेत,” अशी खोचक टिप्पणी करत त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर बोट ठेवले.
Industrial development : ‘आश्वासनांचे कारखाने’ तेजीत; प्रत्यक्ष उद्योग मात्र अजूनही प्रतीक्षेत
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत असताना, महाराजांनी या पार्श्वभूमीवर स्पष्ट भूमिका मांडली. “पुढाऱ्यांनी बुवा-महाराजांच्या नादी लागण्याऐवजी सामान्य नागरिक, शेतकरी आणि शिक्षणाच्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे,” असा सल्ला त्यांनी दिला. त्याचवेळी त्यांनी अंधश्रद्धेवरही विनोदी शैलीत प्रहार केला. “भविष्य सांगणारा अजून जन्मालाच आलेला नाही; मग नेते त्यांच्याकडे का धाव घेतात?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी ‘ज्योतिष-राजकारण’ या समीकरणावर चिमटा काढला.
Flood livestock compensation : अतिवृष्टीग्रस्त पशुपालकांना दिलासा : मदतीच्या नियमांमध्ये बदल
महाराजांनी पुढे सुचवले की, “बुवांच्या पाया पडण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पाया पडले, तर खरी पुण्याई मिळेल.” तसेच ‘लोटाभर पाण्यापेक्षा रक्तदान-देहदान करा’ असा संदेश देत त्यांनी अंधश्रद्धेपेक्षा सामाजिक बांधिलकी महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले.








