व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Ashok kharat case : लैंगिक शोषणाची कबुली, ‘हातचलाखीला विज्ञानाचं नाव’ देत फसवणुक

Ashok kharat case : लैंगिक शोषणाची कबुली, ‘हातचलाखीला विज्ञानाचं नाव’ देत फसवणुक

nashik-fake-baba-ashok-kharat-sexual-exploitation-sit-investigation-police-custody : नाशिकमधील भोंदू अशोक खरातचा धक्कादायक कबुलीजबाब

Nashik: नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा प्रकरणात अशोक खरात याने एसआयटी चौकशीत धक्कादायक कबुलीजबाब दिल्याची माहिती समोर आली असून, महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिल्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. न्यायालयाने खरात याला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, सध्या विशेष तपास पथकाकडून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक खरात याने चमत्कार आणि वशीकरणाच्या नावाखाली केलेल्या कृत्यांचा भंडाफोड करत हे सर्व हातचलाखीचे प्रकार असल्याचे मान्य केले आहे. लोकांना भुलवण्यासाठी आणि विशेषतः महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी विविध युक्त्या वापरल्याचेही त्याने कबूल केल्याचे सांगितले जात आहे. ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ असे वक्तव्य करत त्याने आपल्या फसवणुकीच्या पद्धतींचे समर्थन केल्याची माहिती समोर येत आहे. महिलांना मानसिक दबावाखाली ठेवून त्यांचे शोषण करण्यात आले, तसेच या सर्व प्रकारांना विज्ञानाचे स्वरूप देऊन विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असेही तपासात उघड होत आहे.

bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीवरून राष्ट्रवादी-काँग्रेस वाद पेटला;

या प्रकरणात केवळ लैंगिक शोषणच नव्हे तर आर्थिक गैरव्यवहारांचाही संशय व्यक्त करण्यात येत असून, खरातने मोठ्या प्रमाणावर मालमत्ता जमा केल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची जमीन आणि स्थावर मालमत्ता खरेदी करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज त्याची मुलगी तृप्ताबाला हिची एसआयटीकडून चौकशी होणार असल्याची माहिती आहे. आर्थिक व्यवहारांचा तपास अधिक खोलात नेण्यासाठी कुटुंबीयांची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे. तसेच लवकरच त्याच्या दुसऱ्या मुलीचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Baramati bypoll : सुनेत्रा पवारांच्या अर्जावेळी पुरुष नेत्यांची गर्दी, मात्र केवळ तीन महिला नेत्या !

दरम्यान, नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासाला वेग आला असून, पुढील कारवाईसाठी उद्या पुन्हा अशोक खरात याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत अधिकृत माहिती देण्यासाठी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते या सायंकाळी पत्रकार परिषद घेणार असून, तपासातील महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!