आदिवासी विकास मंत्र्यांची घोषणा; केंद्राच्या धर्तीवर राज्यातही आदिवासी आयोग
Nagpur आदिवासी समाजाच्या विकासाच्या अनुषंगाने नागपुरात आदिवासी संग्रहालय स्थापन करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. त्याचवेळी स्पर्धा परीक्षा ग्रंथालय देखील लवकरच साकारले जाईल, असंही ते म्हणाले. त्यासोबतच केंद्राच्या धर्तीवर राज्यात सर्व आदिवासी योजना एकत्रित राबविण्यात येतील. आदिवासींच्या जीवनात बदल घडावा. त्यांच्या हक्काच्या योजना त्यांच्यापर्यंत थेट पोहोचाव्यात. यासाठी विशेष मोहीम व नियोजन असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.
प्रेस क्लब येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वात आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या काळात आदिवासी विद्यार्थी हा विकासाचा केंद्रबिंदू असणार आहे. या अंतर्गत नागपूर शहराचे महत्त्व लक्षात घेता शहरात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत लायब्ररी आणि रीडिंग रूम सुरू करण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता येणे शक्य होणार असल्याचे ते म्हणाले.
Dharmapal Meshram : चार वर्षांत किती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले?
गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेले आदिवासी संग्रहालय नागपुरात सुरू होणार आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. आदिवासी विभागासाठी यंदाच्या बजेटमध्ये यात १० टक्के निधी वाढवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. ही वाढ समाजाच्या विकासासाठी वापरण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आतापर्यंत राज्यातील नऊ आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला आहे. १७ प्रकल्प कार्यालयाचा आढावा घेण्यात आला आहे. आदिवासी विकास योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. आदिवासी शाळेत एक दिवस मुक्काम हा उपक्रम ७ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी समजून घेतल्या, असंही उईके म्हणाले.
Amitabh Bachchan on Prataprao Jadhav : Big B म्हणाले, ‘प्रतापराव जाधव किस विभाग के मंत्री हैं?
अतिदुर्गम भागातही मुक्काम करण्यात आला. जास्तीत जास्त आश्रम शाळेत सर्व सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, असा प्रयत्न असल्याचे आदिवासी विकास मंत्री म्हणाले. आदिवासी विद्यार्थ्यांनी विदेशात उच्च शिक्षण घ्यावे यासाठी प्रचार आणि प्रसार संकल्प करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.