ATS Operation : दहशतवादी संघटनेत युवकांची भरती, एटीएसची मोठी कारवाई

ats-operation-in-pusad-and-akola-against-terrorist-recruitment-pankaj-bhoyar-praised-police : पुसद आणि अकोल्यात एटीएसचे सर्च ऑपरेशन; घातपाताचा डाव उधळला, मंत्र्यांनी थोपटली पोलिसांची पाठ

Nagpur मागील आठवड्यात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात एकाच वेळी १४ ठिकाणी सर्च ऑपरेशन करून मोठी कारवाई केली. सिमी तसेच काही प्रतिबंधित संघटना या भागात कार्यरत असून युवक व खेळाडूंची दिशाभूल करून त्यांना गैरकृत्यात ओढण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र दहशतवाद विरोधी पथकाने या संघटनांचे इरादे मोडून काढले आहेत.

ही मोहीम ज्या धाडसाने पोलिसांनी राबवली आणि दहशतवादाची पाळेमुळे खणून काढली, त्याबाबत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी पथकातील सर्व अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. प्राप्त माहितीनुसार, पुसद व अकोला शहरातील काही युवकांना दहशतवादी संघटनेत भरती करण्याचे प्रयत्न केले जात होते.

गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज गुरुवारी नागपूरमध्ये उपरोक्त कारवाईची माहिती माध्यमांना दिली. मागील पाच महिन्यांपासून एटीएस या प्रकरणावर लक्ष ठेवून होती आणि गुप्तचर संस्थांच्या माध्यमातून सखोल चौकशी करण्यात आली होती. या कारवाईत घातपात करण्याचा संशय असलेल्या काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Nitin Gadkari : नितीन गडकरी यांची इंस्टाग्रामवरून बदनामी, सायबर पोलिसांनी केले हँडलरवर गुन्हे दाखल

काही संघटना राज्यातील तरुण आणि विद्यार्थ्यांचा गैरफायदा घेऊन त्यांना अशा कृत्यांमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, गुप्तचर यंत्रणांनी वेळीच माहिती मिळवून ही कारवाई यशस्वी केली आहे. गुप्तचर संस्थांमार्फत काही गोपनीय माहिती मिळताच गृह विभागामार्फत तत्परतेने कारवाई केली जाते, असे भोयर यांनी सांगितले.

तत्पूर्वी, काही संशयित व्यक्ती प्रतिबंधित दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचाली करीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार १२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री दहशतवाद विरोधी पथक उमरखेड येथे धडकले. संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतली. त्यांची कागदपत्रे व मोबाईल तपासले.

Nagpur municipal corporation : नागपुरात खऱ्या अर्थाने ‘महिला राज’! १० मिनी महापौरही महिलाच होणार

डिजिटल साधनांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडील माहितीवरून अकोला येथील पार्वतीनगरात एटीएसचे पथक दाखल झाले. येथील काही लोकांच्या घरावर छापे टाकण्यात आले होते. पुसद आणि अकोला येथील काही युवकांची दहशतवादी संघटनेत भरती केली जात असल्याची टीप पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यांच्या या सर्व हालचालींवर पाळत ठेवली जात होती.

या कारवाईनंतर पोलीस या प्रकरणावर बोलण्यास नकार देत होते. संवेदनशील घटना असल्याने पोलीस कारवाईबाबतही सांगण्यास नकार देत होते. मात्र, आज गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी याची सविस्तर माहिती माध्यमांना दिली.