Development works in Pune, Marathwada, Vidarbha gaining momentum,Union Minister : पुणे, मराठवाडा, विदर्भात विकासकामांना गती, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Nagpur : राज्यात नवीन वर्षात रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांसाठी एकूण दीड लाख कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली असून, त्यातून महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. विधानभवन परिसरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचा तपशील मांडला.
गडकरी म्हणाले की, येत्या वर्षभरात मंजूर करण्यात आलेल्या दीड लाख कोटी रुपयांच्या कामांपैकी सुमारे ५० हजार कोटी रुपयांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहेत. पुणे जिल्ह्यासाठी एकट्या ५० हजार कोटी रुपयांची कामे मंजूर असून, ही सर्व कामे पुढील तीन महिन्यांत सुरू होणार आहेत.
Winter session : उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी चार तहसीलदारांसह दहा जण निलंबित
पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान १६ हजार ३१८ कोटी रुपयांचा नवीन एक्सप्रेसवे उभारण्यात येणार असून, त्याचा पहिला टप्पा पुणे–अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर असा असेल. या मार्गावर दुरुस्ती व उड्डाणपूलांसाठी २ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याशिवाय, शिक्रापूर येथून अहिल्यानगरच्या बाहेरून बीड जिल्ह्यातून जाणारा पर्यायी मार्ग तयार करण्यात येणार असून, या मार्गावरील केवळ टोलचे काम शिल्लक आहे. या प्रकल्पांमुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर दोन तासांत, तर छत्रपती संभाजीनगर ते नागपूर अडीच ते पावणे तीन तासांत प्रवास शक्य होईल, असे गडकरी यांनी सांगितले.
तळेगाव–चाकण–शिक्रापूर या मार्गावर चार स्तरांचा एलिव्हेटेड प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यात खालचा रस्ता, त्यावर दोन उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो मार्ग असेल. या प्रकल्पाची किंमत ४ हजार २०७ कोटी रुपये असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि लवकरच भूमिपूजन होणार आहे. हडपसर ते यवत दरम्यान ५ हजार २६२ कोटी रुपयांचा एलिव्हेटेड प्रकल्प प्रस्तावित असून, त्याचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे आणि कॅबिनेटची मान्यता मिळाली आहे. कळंबोळी विकास प्रकल्पासाठी ७७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, ही कामे एमएसआयडीसीकडे देण्यात आली आहेत.
Sudhir Mungantiwar : जनतेच्या प्रश्नांसाठी विधानसभेत मुनगंटीवार आक्रमक
नाशिक फाटा ते खेड हा मार्ग दोन टप्प्यांत विकसित करण्यात येणार असून, त्यासाठी ९३ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक फाटा ते आळंदी फाटा हा ४ हजार ४०३ कोटी रुपयांचा, तर दुसऱ्या टप्प्यात आळंदी फाटा ते खेड हा ३ हजार ३९८ कोटी रुपयांचा प्रकल्प असेल. जुने पुणे नाका ते सातारा चौक दरम्यान नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, वेस्टर्न बायपास ते पुणे–सातारा मार्गासाठी नवीन डीपीआर तयार केला जाणार आहे. साडे सहा ते सात हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असेल.
पुणे–मुंबई एक्सप्रेस हायवेसाठी सामायिक एक्सप्रेस हायवे उभारण्यात येत असून, अटल सेतूपासून जेएनपीटी चौक ते पुणे–शिवार जंक्शनदरम्यान पुणे–बेंगळुरू एक्सप्रेस हायवेचा १३० किलोमीटरचा ग्रीनफिल्ड टप्पा प्रस्तावित आहे. सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पातील पागोटे ते चौक हा पहिला टप्पा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे–मुंबई प्रवास दीड तासांत, तर पुणे–मुंबई–बेंगळुरू प्रवास साडे पाच तासांत पूर्ण होणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.
Digital Census : केंद्र सरकारचे तीन मोठे निर्णय; डिजिटल जनगणनेसाठी ११ हजार ७१८ कोटी मंजूर
विदर्भ आणि मराठवाड्यासाठीही अनेक महत्त्वाचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. नागपूर–काटोल हा नऊ किलोमीटरचा मार्ग, काटोल व जाम बायपास, तसेच २ हजार कोटी रुपयांचा नागपूर–भंडारा सहापदरी मार्ग मंजूर झाला आहे. मराठवाड्यात चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान २ हजार ८०० कोटी रुपयांचा नवीन मार्ग उभारण्यात येणार आहे. तळोदा ते शहादा १,०७४ कोटी रुपयांचा, तळोदा ते यावल १ हजार २४५ कोटी रुपयांचा आणि तळोदा ते रावेर दरम्यान सुमारे १,४०० कोटी रुपयांचा चारपदरी मार्ग विकसित केला जाणार आहे.
याशिवाय, केंद्रीय रस्ते निधी आणि वार्षिक योजनेअंतर्गत ६० हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून, त्यातील २० हजार कोटी रुपयांची कामे सध्या प्रगतीपथावर असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
____






