Bogus voting racket in Buldhana; who is the ‘main mastermind’? : आझाद हिंद संघटनेचे गंभीर आरोप – “बूथ उघडे राहिले असते तर ५ हजार बोगस मतदान झाले असते”
Buldhana नगरपरिषद निवडणुकीत उघडकीस आलेल्या बोगस मतदान प्रकरणाने जिल्ह्यात मोठी खळबळ उडवली असून, आझाद हिंद संघटनेने थेट निवडणूक प्रक्रियेच्या विश्वसनीयतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शहरातील निवडक बूथवर डुप्लिकेट आधारकार्डाच्या आधारे बोगस मतदानाचे रॅकेट कार्यरत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. विशेष म्हणजे हे सर्व पुरावे निवडणुकीपूर्वीच अधिकाऱ्यांकडे देऊनही मोठा धोका टळण्याची वेळ आली होती, असा दावा त्यांनी केला आहे.
आझाद हिंद संघटनेचे अॅड. सतिश रोठे यांनी सांगितले की, भोंडे शाळा, जुनागाव आणि भिलवाडा परिसरातील सहा संवेदनशील बूथवर मोठ्या प्रमाणावर बोगस मतदानाची शक्यता त्यांनी आधीच निवडणूक आयोग, निर्णय अधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना लेखी स्वरूपात कळवली होती. डुप्लिकेट आधारकार्ड, मतदारांची कृत्रिम पुनर्रचना, संशयास्पद लोकांची हालचाल याचे फोटो व दस्तऐवजही सादर केल्याचा संघटनेचा दावा आहे.
Local Body Elections : मतदानाची टक्केवारी कोणाची ‘समिकरणे’ बिघडवणार?
निवडणूक निर्णय अधिकारी आणि एसपी यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून ही सहा बूथ तत्काळ बंद केली. “ही बूथ उघडी राहिली असती, तर किमान पाच हजार बोगस मतदान झाले असते,” असा गंभीर आरोप अॅड. रोठे यांनी केला. संघटनेच्या माहितीनुसार – थड, इब्राहिमपूर, कोथळी, आवा, युनुसपूर, पिंपळगाव देवी, खानदेश सीमेवरील भाग, तसेच हैदराबाद मार्गावरून पहाटेपासून शेकडो संशयित लोक बुलढाण्यात येत असल्याचे इनपुट पोलिसांना देण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी काही भागात अतिरिक्त पथके पाठवून कडक नजर ठेवली.
Arvi Panchayat Samiti : राजपत्रित अधिकारी संघटना सामूहिक रजेवर
आझाद हिंद संघटनेच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण प्रकारामागे सुव्यवस्थित रॅकेट कार्यरत असून त्यात बोगस मतदारांना ट्रॅव्हल करणारे, बूथवर पोहोचवणारे, प्रभाग रचना आपल्या सोयीने बदलणारे, पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा आणणारे, मतदान केंद्राबाहेर गोंधळ निर्माण करणारे —हे सर्व एकाच सूत्रधाग्याचे भाग असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
अॅड. रोठे यांनी प्रभागरचना व बूथ पुनर्रचनेतील अनियमिततेला देखील या प्रकारासाठी जबाबदार ठरवले. त्यांनी मागील तीन महिन्यांपासून स्थानिक कार्यालयांपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत या बाबीवर तक्रारी पाठविल्याचा उल्लेख केला.








