Azad Maidan : सेवानिवृत्त पोलिसांचे आझाद मैदानावर आंदोलन, शासनाने घेतली दखल !

Minister Atul Save has not fulfilled the demands of retired policemen despite assurances : मंत्री अतुल सावेंनी आश्वासन देऊनही झाली नव्हती कार्यवाही

Mumbai : पोलिस दलातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी न्याय्य मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर नुकतेच आंदोलन केले. मागण्यांसदर्भात मंत्री अतुल सावे यांनी आश्वासन दिले होते. मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना आंदोलनाचा पावित्रा घ्यावा लागला. शांततेत झालेल्या या आंदोलनाची दखल शासनाने घेतली आहे. सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष संपतराव जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

अध्यक्ष जाधव व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृह सचिवांना वेळोवेळी भेटून आपल्या मागण्या मांडल्या होत्या. गेल्या वर्षी नागपुरातील हिवाळी अधिवेशनातही मागण्या लाऊन धरल्या होत्या. आठ दिवसांत गृह सचिवांसोबत बैठक लावतो, असे आश्वासन मंत्री अतुल सावे यांनी दिले होते. पण त्यानंतर काम थंड बस्त्यात पडले. त्यामुळे संघटनेने आंदोलन केले.

Shaktipeeth Highway : ‘शक्तीपीठ’ केवळ ठेकेदारांना जगवण्याचा महामार्ग, काँग्रेसचा आरोप

मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात महाराष्ट्रभरातून सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी आले होते. आंदोलनात संस्थेच्या उपाध्यक्ष मिनाक्षी पेठे, रघुनाथ घरटे, अशोक निकम, भारती तिवारी, सुभाष तोडकर, अरुण झोटींग, शरद बोंगाळे, सुबराव लाड, नाना मापारी, अशोक गुंजाळ, नजीर पटेल, प्रकाश लंघे, गणपतराव चिंचाळकर, रवींद्र कामठे या पदाधिकाऱ्यांसह दोन ते अडीच हजार सेविनिवृत्त पोलिस बांधव सहभागी झाले होते.

Nagpur APMC : रातोरात तब्बल ५१ बकरी दलालांच्या परवान्यांचे नुतनीकरण !

६० ते ७० वयोगटातील ज्येष्ठ नागरीकांनी आंदोलन केल्यामुळे शासनाला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. गृह व वित्त विभागाच्या सचिवांनी आंदोलनाची दखल घेत शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले. सविस्तर चर्चा करून फेर प्रस्ताव पाठवत असल्याचे वित्त सचिव रस्गोगी यांनी शिष्टमंडळाला सांगितले.