Babanrao Taywade : राज्यघटनेनुसार कोणत्याही समाजाला आरक्षण देता येत नाही !

 

BJP Leader Chandrakant Patil, Mudhoji Raje Bhosale’s Stand Welcomed : चंद्रकात पाटील, मुधोजी राजे भोसले यांच्या भूमिकेचे स्वागत

Nagpur : ओबीसीच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे जिद्दीला पेटले आहेत. त्यासाठी ते लाखो मराठा बांधवांसह अंतरवली सराटी येथून मुंबईत दाखल जाले. त्यांच्या आंदोलनाला दोन दिवस झाले. त्यांनी आपली मागणी लाऊन धरली आहे. इकडे ओबीसींच्या कोट्यातून कुणालाही आरक्षण देऊ नये, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण करून आपल्या आंदोलनाची सुरूवात केली आहे.

यासंदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले. भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्याही समाजाला आरक्षण देता येत नाही, तर आरक्षण हे जातीला देता येते. त्यामुळे भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या काळात मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन केले होते. मात्र विदर्भ वगळता इतर कुठल्याही भागातील मराठा समाजाने तेव्हा कुणबी जातीचे प्रमाणपत्र घेतले नाही.

Big criticism : ‘त्यांनी’ तुमचा गेम केला तुमच्या मुलाला पाडलं… तरीही !

त्यामुळे आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणे शक्य नसल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे. दरम्यान राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जरांगे पाटील यांचे आंदोलन राजकीय आरक्षणासाठी असल्याची भूमिका मांडली आहे. नागपूर येथील भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनीही मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. या दोघांच्याही भूमिकेचे राष्ट्रीय ओबीसी महासंघ स्वागत करतो, असेही डॉ. तायवाडे यांनी सांगितले.