Jaranges big criticism of Raj Thackeray along with Chandrakant Patil, Rane : जरांगेंची राज ठाकरे सह चंद्रकांत पाटील, राणेंवर मोठी टीका
Mumbai : मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा पेटलेलं असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विधानावरून आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील संतापले आहेत. आझाद मैदानावर आंदोलकांना उद्देशून बोलताना त्यांनी राज ठाकरेंवर थेट निशाणा साधला. “तुमचा पक्ष लोकसभेला फडणवीसांनी संपवला, विधानसभेला तुमच्या मुलाला पाडलं… तरीही तुम्ही त्यांच्याच तळे उचलता!” अशा शब्दांत जरांगेंनी टोला लगावला.
“दोन्ही ठाकरे भाऊ समाजाच्या दृष्टीने ठीक आहेत. पण राज ठाकरे विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नात पडतात. आम्ही त्यांना कधीही बोलावलं नाही. तुमचे १३ आमदार लोकांनी निवडून दिले होते, ते पळून गेले. मग तुम्ही मराठवाड्यात का आलात? नाशिकला ५० वेळा जाता, त्याचं उत्तर द्या. फडणवीस तुमच्या घरी चहा पिऊन गेले आणि तुमचा पक्ष बरबाद झाला तरी चालतो?” असा सवाल करत जरांगेंनी राज ठाकरेंना चांगलंच घेरलं.
राजकीय आरक्षणासाठी धडपड सुरू असल्याचं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावरून जरांगे पाटील संतापले. ते म्हणाले “चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाच्या शिव्या खाऊ नयेत. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून त्यांनी आमच्या दाखल्याची पडताळणी रोखून धरली होती. पुढे त्यांनी जास्त बडबड करू नये.” यावेळी त्यांनी नितेश राणे यांच्यावरही जोरदार टीका केली.
मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे, या भूमिकेवर जरांगे ठाम राहिले. “मंडल आयोगाने ओबीसींना १४ टक्के आरक्षण दिलं होतं, ते ३० टक्क्यांवर कसं गेलं? संविधानाने ५० टक्क्यांची मर्यादा घातली आहे, मग सध्या ५२ टक्के आरक्षण कसं? आमची मागणी कायद्याबाहेर म्हणता, पण तुम्ही घातलेली जाती-पोटजातींची आरक्षणं कायदेशीर आहेत का?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.
Maratha movement : “उदयनराजे जरांगेंच्या मंडपात बसलं पाहिजे; पण हे भाजपचे हस्तक
मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंपासून चंद्रकांत पाटलांपर्यंत सर्वांना लक्ष्य करत घणाघाती हल्ला चढवला. येत्या काही दिवसांत या राजकीय शाब्दिक युद्धाला आणखी धार येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.








