व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Bacchu Kadu : उशाला धरण, तरी शेतकऱ्याच्या नशिबी मरण!

Bacchu Kadu : उशाला धरण, तरी शेतकऱ्याच्या नशिबी मरण!

Farmers should get the benefit of Khadakpurna Dam : युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येवरून बच्चू कडूंची सरकारवर टीका

Buldhana देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी अरमाळ येथील युवा शेतकरी कै. कैलास नागरे यांनी १४ गावांना खडकपूर्णा धरणाचे पाणी मिळावे म्हणून अनेक आंदोलने केली. मात्र, शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झाल्याने त्यांनी होळीच्या दिवशी आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी २६ मार्च रोजी नागरे कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केले.

यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना खडकपूर्णा धरणाचा लाभ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना प्रथम मिळायला हवा, असे स्पष्ट केले. “धरण उशाला आणि मतदारसंघ कोरडा राहतो, हे कसं सहन केलं?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी शासनाच्या धोरणांवर टीका केली.

Zilla Parishad Budget : बांधकाम विभागासाठी ६ कोटी, आरोग्यासाठी १ कोटी!

बच्चू कडू म्हणाले की, हजारो हेक्टर जमीन कोरडवाहू आहे आणि शेतकऱ्यांना वीज-पाण्यासाठी वारंवार आंदोलन करावे लागत आहे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी निष्क्रिय आहेत. जर शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही, तर प्रहार संघटना आंदोलन करून अधिकाऱ्यांना वठणीवर आणेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, कैलास नागरे यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासनाने उचलला नाही, तर तो मी स्वतः करेन, असा शब्दही दिला.

कै. कैलास नागरे यांची मागणी साधी होती. धरण भरल्यानंतर पाणी उपसा करून कालव्यातून सोडून शिवणी अरमाळ परिसरातील तलावात पोहोचवावे, जेणेकरून १४ गावांचा पाणीप्रश्न सुटेल. मात्र, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे शक्य झाले नाही आणि हा दुर्दैवी प्रसंग घडला.

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंना चंद्रशेखर बावनकुळेंचा सल्ला, म्हणाले..

“कैलास नागरे यांची आत्महत्या मनाला चटका लावणारी आहे. शासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर प्रहार जनशक्ती संघटना डेरा टाकल्याशिवाय राहणार नाही,” असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!