Bacchu Kadu : नेत्यांची ‘तोडफोडी’ची भाषा, शेतकरी आंदोलन चर्चेत

The farmers’ protest is making headlines due to the controversial statements of leaders : वादग्रस्त विधानांमुळे गाजतेय ‘शेतकरी लूट वापसी’ सभा

Akola सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्यांच्या वादग्रस्त विधानांचीच जास्त चर्चा सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या बाबतीत तर हे घडताना दिसतच आहे. पण शेतकरी आंदोलनातून देखील वादग्रस्त विधाने होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नेत्यांच्या ‘तोडफोडी’च्या भाषेमुळे शेतकरी आंदोलनही आता चर्चेत आले आहे.

अकोल्यात ‘किसान ब्रिगेड’च्या वतीने आयोजित ‘शेतकरी लूट वापसी संवाद सभा’ वादग्रस्त विधानांमुळे राज्यभर चर्चेत आली आहे.

या सभेत प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी, “जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयाचा गेट तोडला, आता थेट कलेक्टरलाच तोडू” असा आक्रमक इशारा दिला. त्याचप्रमाणे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांनी “नेपाळसारखे दोन-चार मंत्र्यांना तुडवल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही” असे आक्षेपार्ह विधान केले. या वक्तव्यांमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असून, दोन्ही नेत्यांच्या भाषणांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Prakash Ambedkar : ओबीसी नेत्यांच्या धरसोड वृत्तीवर आंबेडकरांची टीका

मराठा मंगल कार्यालयात झालेल्या या सभेला राकेश टिकैत, प्रकाश पोहरे, अजित नवले, विश्वास उटगी यांसह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते. यावेळी शेतकरी कर्जमाफी, पिकांना हमीभाव आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीच्या मागण्या करण्यात आल्या. मात्र बच्चू कडू आणि रविकांत तुपकर यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे सभेच्या मागण्यांपेक्षा वादग्रस्त विधानांकडेच सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.