Bacchu Kadu : निवडणुकीसाठी ‘लाडक्या बहीणीं’चा वापर!

The government is accused of using the ‘Ladki Bahin’ scheme for the elections : बच्चू कडूंचा सरकारवर गंभीर आरोप, योजनेवरूनही टीका

Amravati प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका करताना गंभीर आरोप केले. शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी, शेतमालाचे दर व आत्महत्यांचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. विशेषतः ‘लाडकी बहीण’ योजनेवरून त्यांनी सरकारवर निवडणुकीसाठी महिलांचा वापर केल्याचा आरोप केला.

कडू म्हणाले, “निवडणुकांपूर्वी लाडक्या बहिणींना तीन हप्त्यांत निधी देण्यात आला. मात्र, निवडणुका संपताच अर्ध्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आले. पैशाअभावी ‘लाडका भाऊ प्रशिक्षणार्थी योजना’ बंद केली. हे कार्यक्रम मदतीसाठी नसून, फक्त निवडणुकीपुरते होते.”

Supreme court : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घ्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयीही त्यांनी शंका व्यक्त केली. “प्रशासन ठेवून सगळा कारभार एकाच ठिकाणाहून चालवायचा आहे. निवडणूक आयोग भाजपाच्या कार्यालयातूनच चालवा, ईव्हीएमही तिथे ठेवा आणि लोक आले की बटण तुम्हीच दाबा,” असा उपरोधिक हल्ला त्यांनी केला.

“आमदारांचा पगार दहा वर्षांत ७० हजारांवरून तीन लाखांपर्यंत वाढतो; पण दिव्यांग बांधवांना निधीसाठी लढावे लागते. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला पैसे नसतात; मात्र २०० उद्योगपतींचे लाखो कोटींचे कर्ज सरकारने माफ केले,” असा आरोप त्यांनी केला. सोयाबीन, तूर, धान याला बोनस तसेच जीएसटीचा परतावा देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, पण त्याची पूर्तता झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

OBC Reservation Struggle : ओबीसी उपसमितीच्या बैठकीत साडेतीन हजार कोटींच्या योजनांवर चर्चा !

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरून टीका करताना कडू म्हणाले, “गेल्या सात महिन्यांत सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यापैकी ९० टक्के हिंदू आहेत. मग सरकारचे हिंदुत्व कुठे गेले? प्रभू रामचंद्राचे मंदिर बांधायचे, पण त्यांचा आदर्श वाऱ्यावर सोडायचा, हेच आहे का तुमचे हिंदुत्व?” असा टोलाही त्यांनी लगावला.