For the first time since Sharad Joshi, an ocean of farmers has come together : लढा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही
Nagpur : महाराष्ट्रात शरद जोशी यांच्यानंतर पहिल्यांदाच शेतकरी चळवळीचा महास्फोट बघायला मिळाला. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली महाएल्गार आंदोलनाने महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटना आणि लाखो शेतकऱ्यांना एका झेंड्याखाली आणलं. नागपूर शहर अक्षरशः ३० तास ठप्प झालं, महामार्ग, शहरातील प्रमुख रस्ते शेतकऱ्यांच्या घोषणांनी दणाणले.
गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना होत्या. मात्र त्या एकत्र येऊ शकल्या नव्हत्या. पण बच्चू कडू यांनी शरद जोशींच्या काळाची आठवण करून देत महाएल्गारच्या माध्यमातून एकजूट निर्माण केली आणि शेतकऱ्यांना पुन्हा लढाईच्या मैदानात उभं केलं. धान कापणी, कापूस वेचणी, सोयाबीन मळणीचा काळ सुरू असतानाही लाखो शेतकरी नागपुरात दाखल झाले. हा केवळ आंदोलनाचा नव्हे, तर नेतृत्वावरच्या विश्वासाचा पुरावा होता. बच्चू कडू यांच्यावर विश्वास ठेऊन शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्यावर उतरले आणि विजय मिळवला.
Sikander Sheikh : सिकंदर शेख ‘महाराष्ट्र केसरी’ ते शस्त्रांची तस्करी!
या लढ्यात एकदिलाने साथ देणारे अॅड. वामनराव चटप, राजू शेट्टी, डॉ. अजित नवले, महादेव जानकर, राजन क्षिरसागर, रविकांत तुपकर, ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड, खासदार अमर काळे, माजी खासदार उमेश पाटील, सलील देशमुख आणि हजारो कार्यकर्त्यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले. महाराष्ट्रात शरद जोशी यांच्यानंतर बच्चू कडू यांच्या रुपाने एक नवा शेतकरी नेता मिळाल्याची चर्चा राज्यात सर्वत्र सुरू आहे.
Vote theft : सुलभ शौचालयचा पत्ता, बसल्या बसल्या सही घेतली का?
या आंदोलनात अडीच हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पण लढा सुरूच आहे. गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाही. हा लढा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आहे, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या. या महाएल्गारमुळे शरद जोशींच्या काळानंतर पहिल्यांदाच शेतकऱ्यांचा आवाज इतक्या ताकदीने सरकारच्या कानांत घुमला आहे.








