The BJP’s tendency to stab allies in the back : पाठीत सुरा खुपसण्याची भाजपची प्रवृत्ती
Nagpur : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन वापरली जाणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. विरोधी पक्षांकडून याचा जोरदार विरोध केला जात आहे. यासाठी आता प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडूही सरसावले आहेत. ईव्हीएम मशीन हे काँग्रेसचेच पाप आहे. त्यांनी ईव्हीएम मशीन आणली नसती, तर हा वटवृक्ष तयारच झाला नसता, असे त्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बच्चू कडू म्हणाले, या वटवृक्षामुळे आमची घरे उद्ध्वस्त होऊ लागली आहेत. व्हीव्हीपॅट मशीनवर मोजणी करण्याची मागणी यापूर्वीही आम्ही केली होती. पण भाजपमध्ये तेवढी मर्दानगी नाही, ते नामर्द आहेत, असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला. आपण प्रत्यक्ष लढाईत हरणार हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे जिंकायचे असेल तर चोरी महत्वाची आहे. हे चोरी करून जिंकणारे लोक आहेत. पाठीमध्ये सुरा खुपसण्याची भाजपची प्रवृत्ती आहे, असाही आरोप त्यांनी केला.
Maoist Movement : भुपतीच्या जुन्या सहकाऱ्यांनीही स्वीकारला होता संविधानाचा मार्ग !
आगामी काळात महाएल्गार सभा आयोजित केली जाणार आहे. त्यामध्ये आम्ही आमच्या मागण्या घेऊन सरकारला विनंती करू. त्यानंतर काय करायचे ते पाहू, अन् न्याय मिळाला नाहीच, तर मुक्कामी राहू. कारण आज शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे, ती निवडणुकीपेक्षा महत्वाची आहे. विदर्भात कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी तर रत्नागिरीमध्ये आंबा उत्पादक शेतकरी संकटात आहे. पिकवणारे शेतकरी सध्या सर्वात दुःखी आहे. पुजेला ब्राह्मणाचा हात लागला की ती पवित्र होते. त्याचप्रमाणे मालाला शेतकऱ्यांचा हात लागला की तो स्वस्त होतो आणि व्यापाऱ्यांचा हात लागला की, तो महाग होतो, असा कारभार सरकार करत आहे, असे म्हणत बच्चू कडू यांनी सत्ताधाऱ्यांना भाजपची लगावला.