व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Maoist Movement : भुपतीच्या जुन्या सहकाऱ्यांनीही स्वीकारला होता संविधानाचा मार्ग !

Maoist Movement : भुपतीच्या जुन्या सहकाऱ्यांनीही स्वीकारला होता संविधानाचा मार्ग !

Maoist Movement Crippled in Gadchiroli Distric : असीन राजाराम आणि जनिता जाडे होते प्रभावाखाली

Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला एक मोठा झटका बसला आहे. जहाल नक्षलवादी भुपती ऊर्फ सोनू याने आपल्या तब्बल ६० सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात माओवादी चळवळीला मोठा झटका बसला आहे. भुपतीने आत्मसमर्पण केल्यानंतर त्याच्या जुन्या सहकाऱ्यां त्याचे स्वागत केले आहे.

भुपती हा माओवाद्यांचा सर्वोच्च नेता होता. त्याने आत्मसमर्पण केल्यानंतर त्याच्या जुन्या सहकाऱ्यांनी त्याचे स्वागत केले आहे. असीन राजाराम आणि जनिता जाडे हे दोन युवा माओवादी भुपतीच्या प्रभावाखाली होते. भुपतीच्या अनेक मोहिमांमध्ये हे दोघे सहभागी झाले होते. अनिता वयाच्या ११ व्या वर्षी आणि असीन वयाच्या १२व्या वर्षी माओवादी चळवळीमध्ये सहभागी झाले होते.

Naxalism : गडचिरोलीत 1980 पासून हिंसाचारात 538 सामान्यांचा बळी

राजाराण तब्बल २६ वर्षे माओवादी चळवळीत सक्रीय होता, तर जनिता जाडे ही १८ वर्षे माओवाद्यांच्या सशस्त्र क्रांतीमध्ये सहभागी होती. या दोघांनीही शस्त्र क्रांतीचा मार्ग सोडून भारतीय राज्यघटनेचा मार्ग स्वीकारून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला आधीच घेतला होता. भुपतीनेच या दोघांचे लग्न माओवादी कॅडरमध्ये असताना लावले होते. त्यानंतरही ते माओवादी कारवायांमध्ये सक्रीय होते.

Major changes: मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्रीपद सोडले

भारतीय संविधान हेच आपल्याला न्याय देऊ शकते, बंदुकीतून मिळालेली क्रांती बंदुकीतूनच हिरावली जाऊ शकते. परंतु संविधानातून मिळालेली क्रांती कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असा विश्वास त्यांच्यात निर्माण झाल्यामुळे त्यांनी काही काळापूर्वी महाराष्ट्र पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आता भुपतीनेही ६० सहकाऱ्यांसह हाच मार्ग स्वीकारल्याने या दोघांनी त्याचे स्वागत केले आहे.

error: Content is protected !!