Breaking

Bachu Kadu : बच्चू कडू आक्रमक, राज्यभर चक्काजाम आंदोलन

Elgar of prahar, activists arrested, tension in state ; प्रहारचा एल्गार, कार्यकर्त्यांची धरपकड, राज्यात तणाव

Mumbai : राज्यातील सामाजिक न्यायासाठी नेहमीच लढा देणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आता अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारच्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी त्यांनी पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी, दिव्यांग, शेतमजूर, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे प्रश्न घेऊन राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बच्चू कडू सातत्याने विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, कर्जमाफी, दिव्यांगांच्या समस्या, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न, मेंढपाळ व मच्छीमार बांधवांच्या अडचणी यांचा समावेश आहे. या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी आधी उपोषण केले नंतर पदयात्रा काढली आणि आता ही लढाई निर्णायक टप्प्यावर पोहचली आहे.

High Court Nagpur Bench : ठाकरे, दटकेंकडून आचारसंहितेची पायमल्ली, हायकोर्टात याचिका

बच्चू कडू यांनी जाहीर केलं की, राज्यभर सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी चक्काजाम आंदोलन होईल. सरकारला वारंवार स्मरण करूनही ते आश्वासनांची पूर्तता करत नाहीत. आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. आमचं आंदोलन आता सरकारच्या हातात राहणार नाही. सरकारलाच अशांतता पाहिजे असं वाटतंय. त्यामुळेच कर्जमाफी जाहीर केली जात नाही. हे आमच्यावर दबाव टाकण्याचं षड्यंत्र आहे.

नागपूरमध्ये काल प्रहार संघटनेच्या सुमारे 200 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यावर बच्चू कडू म्हणाले, ज्या जिल्ह्यां मध्ये पोलीस अधीक्षक आंदोलन होऊ देणार नाहीत, तिथे आम्ही पुन्हा चक्काजाम करू. आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला, तर राज्यात आणखी मोठा उद्रेक होईल. सध्या पावसाचा अनिश्चित पॅटर्न, सरकारची दिशाहीन धोरणं आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त भूमिकेमुळे शेतकरी आधीच अस्वस्थ आहेत.

या पार्श्वभूमीवर प्रहारच्या आंदोलनाला शेतकरी, दिव्यांग, मजूर वर्ग आणि इतर विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.
याशिवाय मनसेसह काही विरोधी पक्षांनीही आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

Ravikant Tupkar : लोणार व शेगाव तालुक्यात ढगफुटीचा कहर; पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, कर्जमाफीची तात्काळ अंमलबजावणी, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमारांसाठी विशेष योजना
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित करणे,मजूर व असंघटित कामगारांसाठी संरक्षण योजना या प्रमुख मागण्यांसाठी बच्चू कडू आंदोलन करत आहेत.सद्यस्थितीत सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, वरिष्ठ पातळीवर या आंदोलनाबाबत गंभीर चर्चा सुरू आहे. काही मंत्र्यांनी बच्चू कडूंशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.