Bail Pola : बैलांच्या झुलीतून नारा, “सातबारा कोरा करा, कर्जमाफी द्या”

Prahar Party’s protest on Bail Pola in Malkapur : मलकापूरात प्रहार पक्षाचे बैलांच्या पाठीवरून आंदोलन

Malkapur शेतकरी कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने मलकापूरात आगळावेगळ्या पद्धतीने पोळा सण साजरा करत सरकारला इशारा दिला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सजवलेल्या बैलांच्या पाठीवर मागण्यांची झूल टाकून शासन-प्रशासनाचे लक्ष वेधले.

प्रहार पक्षाने पोळ्याच्या पारंपरिक सणाला या वेळी आंदोलनाचे स्वरूप दिले. लंपी रोगामुळे यंदा प्रशासनाने मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले असतानाही प्रहार पक्षाने मर्यादित स्वरूपात प्रतीकात्मक आंदोलन करत “शेतकऱ्यांच्या श्रमाचे मोल द्या, कर्जमुक्ती द्या” असा संदेश दिला.

Adivasi Pardhi Development Council : लऊळ गावातील पारधी समाजाच्या वन हक्क दाव्यांना मिळाला न्याय !

शेतकऱ्यांच्या कष्टात बैलांचा सिंहाचा वाटा आहे, आणि त्यांच्यासाठी साजरा होणारा पोळा हा कृतज्ञतेचा दिवस मानला जातो. मात्र, या सणाच्या निमित्ताने प्रहारने सरकारकडे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या मांडल्या. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी व
सातबारा कोरा करण्याची हमी द्यावी अशी मागणी करण्यात आली.

Local Body Elections : प्रभाग रचना ‘जैसे थे’; काहींना दिलासा, काहींना धाकधूक!

या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप, शेतकरी संघटनेचे दामोधर शर्मा, रणजित डोसे, तालुका प्रमुख अजित फुंदे, शहर प्रमुख बलराम बावस्कर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाने स्पष्ट इशारा दिला की, “शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या न मानल्यास पुढील काळात व्यापक आंदोलन छेडले जाईल.”