Balen Shah : नेपाळमध्ये सत्तांतर; रॅपर बालेन शाह नवे पंतप्रधान !

Parliament, courts under fire, KP Sharma Oli finally resigns : संसद, न्यायालयाला आग, केपी शर्मा ओली यांचा अखेर राजीनामा

Kathmandu : नेपाळमध्ये मोठे सत्तांतर झाले आहे. आता नेपाळच्या नेतृत्वाची सूत्रे नवीन चेहऱ्याकडे वळणार आहेत. आंदोलकांनी काठमांडूचे महापौर आणि लोकप्रिय रॅपर बालेन शाह यांचे नाव पुढे केले असून ते नेपाळचे नवे पंतप्रधान ठरणार आहेत.

बालेन शाह यांचा जन्म २७ एप्रिल १९९० रोजी काठमांडूमध्ये झाला. ते अभियंता असून कर्नाटकातील विश्वेशरैय्या टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून एम.टेक. पदवी त्यांनी घेतली आहे. संगीताची आवड असल्यामुळे त्यांनी रॅपर म्हणूनही नाव कमावले. २०१२ मध्ये ‘सडक बालक’ या गाण्यामुळे ते चर्चेत आले आणि २०१३ मध्ये ‘ रॉ बार्झ रॅप बॅटल’ मधून त्यांची लोकप्रियता आणखी वाढली.

Chandrashekhar Bawankule : ..तर रोहित पवारांनी राजकीय सन्यास घ्यावा !

 

राजकीय प्रवासात त्यांनी २०२१ मध्ये काठमांडूच्या महापौरपदाची निवडणूक स्वतंत्र उमेदवार म्हणून लढवली. २६ मे २०२२ रोजी त्यांनी जोरदार विजय मिळवत नेपाळी काँग्रेस आणि यु एम एल यांसारख्या मोठ्या पक्षांच्या उमेदवारांना पराभूत केले. ३० मे २०२२ रोजी पहिले स्वतंत्र महापौर म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यांच्या निर्भीड शैलीमुळे आणि भ्रष्टाचाराविरोधी भूमिकेमुळे ते थेट युवकांचे प्रतिनिधी मानले जातात.

Cabinet meeting : शेतकऱ्यांना दिलासा, शहरांसाठी विकास प्रकल्प

त्यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली असून २०२३ मध्ये टाइम मॅगझिनच्या टाईम 100 न्यू यादीत त्यांचा समावेश झाला. अभियंता, रॅपर आणि राजकारणी अशा तिहेरी ओळखीमधून बालेन शाह आता नेपाळच्या सत्तेच्या गादीवर विराजमान होणार आहेत. जेन झेड पिढीच्या अपेक्षा त्यांच्या खांद्यावर असून नेपाळच्या नव्या राजकारणाला ते एक वेगळा चेहरा देणार आहेत.

____