Banjara Community : बंजारा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर बुलडाण्यात तातडीची बैठक

An urgent meeting in Buldhana on the reservation issue of the Banjara community : २५ सप्टेंबरला जाहीर सभा, सरकारवर आणणार दबाव

Buldhana : बंजारा समाजाच्या आरक्षण प्रश्नाला गती देण्यासाठी बुलढाणा येथे गोल्डन पॅलेस येथे तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत हैदराबाद गॅझेटियरच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजासंदर्भातील शासन निर्णयाप्रमाणेच बंजारा समाजालाही आरक्षण मिळावे, अशी ठाम भूमिका व्यक्त करण्यात आली.

बैठकीत ठरविण्यात आले की, हैदराबाद सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरारचा १९५० चा भारत सरकार गॅझेट, १९५६ चा करारनामा तसेच आयोगांच्या शिफारशींचा आधार घेऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे. संविधानातील अनुच्छेद १४ व २१ नुसार नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

OBC Reservation : ओबीसी विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटवणे ही सत्ताधाऱ्यांची खेळी

बैठकीत जाहीर करण्यात आले की, येत्या २५ सप्टेंबर रोजी जिजामाता प्रेक्षागृहात जिल्हास्तरीय सभा घेण्यात येईल. या सभेनंतर जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार आहे.

Anish Damania : मिस्टर दमानियांची सरकारच्या ‘मित्रा’ संस्थेत नियुक्ती !

या तातडीच्या बैठकीस जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यामध्ये आकाश जाधव, संजय राठोड, राजू नायक, अभय चव्हाण, विठ्ठल चव्हाण, अनिल चव्हाण, राजेश फकिरा राठोड, निलेश राठोड, अनिल राठोड, रमेश चव्हाण, दयाराम जाधव, उखा चव्हाण, विठ्ठल मामा, राजू राठोड, विनायक राठोड, दिगंबर चव्हाण, भारत राठोड, विलास रामावत, छोटू पवार, तेजराव जाधव, बाबू सिंग जाधव, रितेश चव्हाण, उमेश राठोड, अश्विन जाधव, मांगीलाल महाराज, भुजंग सर, प्रकाश चव्हाण आदी मान्यवरांचा समावेश होता.