Banner controversy : बॅनर वादाने राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ; रोहित पवारांचा तीव्र निशाणा !

raigad-banner-controversy-rohit-pawar-sunil-tatkare-aditi-tatkare-reaction : आदिती तटकरे यांची दिलगिरी, सुनील तटकरे यांची चौकशीची मागणी

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला असून रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथील एका कार्यक्रमातील बॅनरवरून नवा वाद पेटला आहे. या बॅनरवर दिवंगत नेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे फोटो नसल्याने राजकीय वातावरण तापले असून आमदार रोहित पवार यांच्या टीकेनंतर मंत्री आदिती तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया देत दिलगिरी व्यक्त केली आहे.

इंदापूर विभागातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र, कार्यक्रमाच्या बॅनरवर केवळ सुनील तटकरे यांचाच फोटो झळकला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच दिवंगत अजित पवार यांचे फोटो नसल्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला.

kerosene sale : अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय

या घटनेचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर बोचरी टीका केली. त्यांनी या प्रकाराची तुलना जमिनीच्या व्यवहाराशी करत “मालकाला बाजूला सारून बटाईदारच ७/१२ स्वतःच्या नावावर करतो, त्याचे हे उदाहरण आहे,” असे म्हणत अप्रत्यक्षपणे पक्षातील सत्तासंघर्षावर निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्यामुळे तटकरे समर्थकांमध्ये नाराजी पसरली.

रोहित पवार यांच्या टीकेनंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सामंजस्याची भूमिका घेत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, हा कार्यक्रम स्थानिक कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता आणि ग्रामपंचायत पातळीवरील या कार्यक्रमात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो नसणे ही चूक असल्याचे मान्य करत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

Devendra fadnavis : पेट्रोल अफवांवर कारवाई, अशोक खरात प्रकरणी निष्पक्ष चौकशी !

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाला दोन महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी भावनिक पोस्ट शेअर करत त्यांच्या अपघाताची निष्पक्ष आणि जलद चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षासाठी काम करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले असून आगामी काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.