Baramati by election : बारामती पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत मतभेद उफाळले !

baramati-by-election-congress-warning-ncp-sharad-pawar-group-mahavikas-aghadi-conflict :
“तुतारीने उमेदवार द्यावा अन्यथा काँग्रेस उतरणार”, पदाधिकाऱ्यांचा इशारा

Baramati : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मतभेद उघडपणे समोर येऊ लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. “तुतारी” चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या या गटाने उमेदवार दिला नाही, तर काँग्रेस स्वतःचा उमेदवार उभा करेल, असा स्पष्ट इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच बारामतीसह राज्यातील पोटनिवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट करत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट निवडणूक लढवणार नसेल, तर काँग्रेस पर्याय म्हणून उमेदवार देण्याचा विचार करेल, असे म्हटले होते. या वक्तव्यानंतर आता काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.

Mohan Bhagwat: संघासाठी अनुकूल काळ, परंतु बाधा टाळण्यासाठी ‘व्हॅक्सिनेशन’ची गरज, सरसंघाचालक डॉ. मोहन भागवत

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी थेट सवाल उपस्थित करत विचारले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेमका भारतीय जनता पक्षासोबत आहे की महाविकास आघाडीत, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे. बारामतीत काँग्रेसची संघटना मजबूत असून, राष्ट्रवादीमुळे काँग्रेस वाढली नाही, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी अनेक वेळा राष्ट्रवादीने युती करून काँग्रेसला अडचणीत टाकल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती पोटनिवडणुकीबाबत आपली भूमिका पुन्हा स्पष्ट करत, “आम्ही ही निवडणूक लढवणार नाही. सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नाही,” असे सांगितले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Mohan bhagwat : “दोन माणसांचे भेटणे थांबत नाही, तोपर्यंत संघ बंद होणार नाही”

बारामती पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.

Ashok kharat case : “रुपाली चाकणकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा”५८ व्हिडिओंनी वाढली खळबळ !

या सर्व घडामोडींमुळे बारामती पोटनिवडणूक केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित न राहता राज्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत अंतिम निर्णयासाठी अद्याप अधिकृत चर्चा झालेली नसली, तरी काँग्रेसने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे या निवडणुकीत नवे राजकीय समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

__