Flight service from Amravati postponed : शासनाकडून नुसताच गाजावाजा, मुहूर्त टळला
Amravati अमरावती विमानतळावरून ३१ मार्चपासून प्रवासी विमानसेवा सुरू होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. मात्र, अद्याप विमानसेवेचे वेळापत्रक आणि उद्घाटनाची तारीख निश्चित न झाल्याने या सेवेला विलंब होत आहे. येत्या १५ ते २० दिवसांत उद्घाटन होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
अमरावती विमानतळावर नवीन धावपट्टी तयार करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. १८ बाय ५० मीटर आकाराच्या या धावपट्टीवरून Runway ७२ आसनी एटीआर विमान सहज उड्डाण करू शकते. प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत मुंबई-अमरावती-मुंबई या मार्गावर ‘अलायन्स एअर’तर्फे विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज झाले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) १३ मार्च रोजी त्याला परवाना दिला आहे.
Jansangharsh Urban Fund : अरे बाप रे! ५ हजार ७७३ पानांची Chargesheet?
अलायन्स एअरच्या मुंबई-अमरावती-मुंबई या विमानसेवेला आठवड्यातून तीनदा उड्डाण करण्याची परवानगी मिळाली आहे. अमरावती विमानतळाला ‘एव्हीटी’ AVT हा ‘आयएटीए कोड’ IATA मिळाला आहे. ‘आयएटीए’ ही आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना आहे. मात्र, अलायन्स एअरने अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
विमानसेवा सुरू करण्यासाठी क्रू मेंबर्स, एअर होस्टेस, वैमानिक यांची नियुक्ती, तसेच विमानतळावर कार्यालय, चेक-इन आणि चेक-आऊट व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा आदी आवश्यक गोष्टींची तयारी सुरू आहे. प्रमाणपत्र चाचणी यशस्वी झाल्यानंतरच तिकिटांची विक्री सुरू होईल, अशी माहिती विमान उड्डाण क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.
दरम्यान, विमानतळाच्या परिसरात उद्घाटन सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. लवकरच अधिकृत तारीख जाहीर होईल, मात्र ३१ मार्चचा मुहूर्त टळल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणत्याही विमानसेवेला उड्डाण सुरू करण्यासाठी किमान १५ दिवस लागतात, कारण विमानसेवेची अंतिम जबाबदारी संबंधित एअरलाइन्सकडे असते.
अमरावतीकर आता विमानसेवेच्या वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत आहेत. ‘अलायन्स एअर’च्या alliance air संकेतस्थळावर अमरावती विमानतळाचे नाव झळकत असले तरी, वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. आठवड्यातून तीन दिवस या मार्गावर विमानसेवा सुरू होण्याची शक्यता असून, अमरावती विमानतळावरून पहिल्या व्यावसायिक उड्डाणाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.