Bharat band : केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी संप

nationwide-strike-impact-on-banks-offices-transport : बँका, सरकारी कार्यालये, वाहतूक आणि बाजारपेठांवर परिणामाची शक्यता

new Delhi: केंद्रीय कामगार संघटना आणि विविध शेतकरी संघटनांनी आज 12 फेब्रुवारी 2026 रोजी देशव्यापी भारत बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला असून देशभरातून मोठ्या प्रमाणात कामगार सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंदाजे 30 कोटी कामगार या आंदोलनात सहभागी होतील, असा दावा संघटनांकडून करण्यात आला आहे.

या बंदमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सरकारी कार्यालये, विमा कंपन्या, काही उद्योग-कारखाने तसेच स्थानिक बाजारपेठांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये कामगार संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून दुपारी दोन वाजता विविध ठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामकाजात अडथळे येऊ शकतात.

Manoj jarange : “मला मारण्यासाठी सुपाऱ्या दिल्या जात आहेत”

केंद्र सरकारने पूर्वी अस्तित्वात असलेल्या 29 कामगार कायद्यांच्या जागी चार नवीन कामगार संहितांची अंमलबजावणी केली आहे. या संहितांमुळे कामगारांचे हक्क कमी होण्याची भीती संघटनांनी व्यक्त केली आहे. नोकरीची सुरक्षितता धोक्यात येईल, कंत्राटीकरण वाढेल आणि कामगारांच्या सामाजिक सुरक्षेवर परिणाम होईल, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या व्यतिरिक्त खासगीकरणाच्या धोरणाला विरोध, वेतनातील तफावत दूर करणे, वीज दुरुस्ती विधेयक आणि बियाणे विधेयकातील तरतुदींवर आक्षेप, तसेच मनरेगा योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची मागणी करण्यात आली आहे.

संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान सभा यांसारख्या शेतकरी संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. तसेच ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनसह काही प्रमुख बँक संघटनांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखांमध्ये व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. तथापि, ऑनलाइन बँकिंग सेवा आणि एटीएम सेवा सुरू राहण्याची शक्यता आहे.

काही राज्यांमध्ये विशेषतः केरळ, ओडिशा आणि कर्नाटक येथे बंदचा परिणाम अधिक जाणवू शकतो, असे संकेत मिळत आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये उपस्थिती कमी राहण्याची शक्यता असून बाजार समित्या, भाजी मंडई आणि औद्योगिक क्षेत्रांमध्येही कामकाजावर परिणाम दिसू शकतो. मात्र अत्यावश्यक सेवा जसे की रुग्णालये, औषध दुकाने, एम्ब्युलन्स सेवा तसेच विमानतळ आणि विमान सेवा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूरच्या राजकारणाचा ‘रिमोट’ सुधीर मुनगंटीवारांच्या हाती; जबलपूरमधून घडवला सत्तेचा चमत्कार

दरम्यान, केंद्र सरकारकडून या बंदाबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी प्रशासन सतर्क असल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनी आजच्या दिवशी प्रवास आणि बँक व्यवहारांसंदर्भात पूर्वतयारी करूनच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात येत आहे.