Bhushan Gavai : मी मूळतः धर्मनिरपेक्ष; आंबेडकर, राज्यघटनेमुळेच आज या पदावर !

Chief Justice Bhushan Gavais thoughts before retirement : सेवानिवृत्तीपूर्वी सरन्यायाधीश भूषण गवईंचे मनोगत

New Delhi : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सेवानिवृत्तीपूर्वी आपल्या आयुष्याचा आणि प्रवासाचा भावनिक आढावा घेत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशनच्या निरोप समारंभात बोलताना त्यांनी सांगितले की ते वैयक्तिक आयुष्यात बौद्ध धर्माचे पालन करतात, पण प्रत्यक्षात ते धर्मनिरपेक्ष आहेत आणि सर्व धर्मांमध्ये समान विश्वास ठेवतात. हिंदू, बौद्ध, शिख, इस्लाम आणि ख्रिश्चन आदी सर्व धर्मांविषयी आदराची भावना आपल्या मनात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या न्यायपालिकेने दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी आपल्या प्रवासातील अनेक आठवणी उपस्थितांसमोर मांडल्या.

23 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणारे गवई शुक्रवारी शेवटचा कामकाजाचा दिवस पार पाडला. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले की त्यांचे वडील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी होते आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांचे पालन करत. त्यांच्याकडूनच बहुधर्मीयतेची शिकवण मिळाली. लहानपणी वडील आणि त्यांचे मित्र त्यांना दर्गा, गुरुद्वारा आणि विविध धार्मिक स्थळी घेऊन जात असत. “धर्माचा सखोल अभ्यास नसला तरी सर्व धर्मांबद्दल आदर हा माझ्या वृत्तीचा पाया आहे,” असे त्यांनी नमूद केले.

Disagreements in the Deshmukh family : सलील देशमुखांचा तडकाफडकी राजीनामा; कुटुंबातील मतभेद पुन्हा चर्चेत !

सरन्यायाधीशI गवई यांनी आपल्या प्रवासाबद्दल बोलताना भावनिक होत सांगितले की नगरपालिकेच्या शाळेत जमिनीवर बसून शिकणाऱ्या एका मुलाने सर्वोच्च न्यायाधीशपदाची स्वप्ने पाहणे शक्य झाले ते फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटनेमुळेच. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या राज्यघटनेच्या मूल्यांनुसार जगण्याचा प्रयत्न आपण नेहमी केला असल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालय हे केवळ सरन्यायाधीशकेंद्रित न राहता सर्व न्यायमूर्तींचे न्यायालय असावे, अशीही त्यांनी महत्त्वपूर्ण भावना व्यक्त केली.

Factionalism in Congress : काँग्रेसमध्ये ‘सपकाळ प्रकरण’ तापले, संघाच्या नगरकार्यवाहाला पाठिंबा देऊन ओढवला वादंग !

निरोप समारंभात न्यायमूर्ती कांत यांनीही गवई यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. त्यांचा मानवीय दृष्टिकोन, सर्वांमध्ये मिसळण्याची वृत्ती आणि आपुलकीने केलेला पाहुणचार या गुणांचे कौतुक त्यांनी केले. सेवानिवृत्तीनंतरही गवई न्यायपालिका आणि संस्थांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करतील, त्यांचा अनुभव ही न्यायसंस्थेची मोठी संपत्ती आहे असे न्यायमूर्ती कांत यांनी सांगितले.

______