Bias in fund distribution, MLAs warn of hunger strike : उद्धवसेनेचे आमदार नितीन देशमुख आक्रमक
Akola नगरोत्थान योजनेअंतर्गत बाळापूर नगरपरिषदेसाठी मंजूर निधी अद्यापही वितरित झालेला नाही. त्यावर उद्धवसेनेचे आमदार नितीन देशमुख आक्रमक झाले आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना पत्राद्वारे २७ जानेवारीपर्यंत निधी वितरित करण्याचे अल्टिमेटम दिले आहे. अन्यथा, २८ जानेवारीपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हा परिषद, महानगरपालिका, आणि नगरपरिषदांच्या विकासकामांसाठी शासन दरवर्षी निधी मंजूर करते. ४ जुलै २०२४ रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अकोला महानगरपालिका व इतर सहा नगरपरिषदांसाठी निधी वाटप मंजूर झाले होते. मात्र, बाळापूर नगरपरिषदेसाठी मंजूर निधी अद्याप वितरित न झाल्यामुळे विकासकामे ठप्प झाली आहेत.
Search operation for Bangladeshi infiltrators संशयित बंगाली कारागिरांची चौकशी !
आमदार देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर पक्षपातीपणाचा आरोप करत म्हटले की, “मी विरोधी पक्षाचा आमदार असल्याने निधी वाटप अडवला गेला आहे. हा सर्वसामान्य जनतेवर अन्याय असून याबाबत शासनाकडे तक्रार करणार आहे.”
देशमुख यांनी माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. “विखे-पाटील यांनी कधीही निधी वाटप रोखले नाही, मात्र सध्याच्या प्रक्रियेमुळे विकासावर परिणाम झाला आहे,” असे ते म्हणाले.
Municipal Corporation Elections : मनपा निवडणूकीसाठी सरसावल्या नागपुरातील आंबेडकरवादी संघटना
‘२८ जानेवारीपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आमरण उपोषण सुरू होईल,’ असा ठाम निर्धार देशमुख यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी शासनाच्या अन्यायकारक धोरणाचा तीव्र विरोध करण्याची भूमिका मांडली आहे.