व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Municipal Corporation Elections : मनपा निवडणूकीसाठी सरसावल्या नागपुरातील आंबेडकरवादी संघटना

Municipal Corporation Elections : मनपा निवडणूकीसाठी सरसावल्या नागपुरातील आंबेडकरवादी संघटना

We will fight the upcoming municipal elections together with renewed enthusiasm and make them a success : आगामी महापालिकेची निवडणूक नव्या उत्साहाने एकत्र लढून यशस्वी करणार

Nagpur : आगामी मनपा निवडणूकीसाठी नागपुरातील आंबेडकरवादी संघटना सरसावल्या आहेत. काही संघटनांनी एकत्रित येत याबाबत मंथन केले. आता बहुतेक आंबेडकरवादी पक्ष मृतप्राय झाले आहेत. मात्र, आंबेडकरी संघटना व कार्यकर्ते संपलेले नाहीत. ते नव्या जोमाने उभे राहतील. आगामी महापालिकेची निवडणूक नव्या उत्साहाने एकत्र लढून यशस्वी करू, असा निर्धार एका सभेत करण्यात आला.

समता सैनिक दलासह विविध आंबेडकरवादी संघटनांचे कार्यकर्ते, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांची ‘नागपूर महापालिकेची निवडणूक आणि आंबेडकरवाद्यांची जबाबदारी’ या विषयाच्या अनुषंगाने निर्धार सभा घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पखाले, ज्येष्ठ रिपब्लिकन नेत्या माया कांबळे, एसएसडीचे अशोक बोदाडे, विचारवंत डॉ. एस. के. गजभिये, छाया खाेब्रागडे, चंद्रकांत दहिवले, किशाेर चाैधरी प्रामुख्याने उपस्थित हाेते.

Chandrashekhar bawankule: आता मोठ्या जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये!

केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपाने धर्माच्या आधारे बहुसंख्याकवाद लादला आहे. सत्ताधारी पक्षाच्या अशा धाेरणात वेगवेगळ्या नावाने स्थापित झालेले आंबेडकरवादी पक्ष व संघटना सजग राहिल्या नाहीत. ते भाजपाच्या ताटाखालचे मांजर झाले. काही सत्ता प्राप्तीसाठी मदत करत राहिले. परिणामी २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत मरणाच्या वाटेवर असलेले आंबेडकरी पक्ष २०२४ मध्ये प्रत्यक्षात मृत्यू पावले, अशी टीका या सभेत करण्यात आली.

सद्यपरिस्थितीत आंबेडकरवाद्यांचा राजकारणात कोणीही वाली नाही. राजकारणाअभावी प्रश्न बिकट झाले आहेत. रस्त्यावरील आंदोलनातून ते सुटत नाहीत. हे हत्यार सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीच्या धोरणामुळे बिनकामी ठरत आहे. यावर उपाय म्हणजे आंबेडकरवाद्यांनी राजकीय भूमिका घेऊन स्वतःची राजकीय ताकद वाढविण्याची गरज मिलिंद पखाले यांनी व्यक्त केली.

Home minister of Maharashtra: वर्धा जिल्ह्यात गुन्हेगारी घटली!

गेल्या १५ वर्षांत नागपूर शहरातील झाेपडपट्ट्यांची अवस्था बकाल झाली आहे. आराेग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. नागरी समस्या अधिकाधिक बिकट हाेत आहेत. शिक्षण सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. महापालिकेच्या शाळा बंद पाडल्या जात आहेत किंवा खासगी कंत्राटदारांकडे दिल्या जात आहेत. मनपाच्या सर्व शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण, डाॅ. आंबेडकर यांच्या स्मारकाचा प्रश्न हेच मुद्दे निवडणुकीत महत्त्वाचे असल्याचे मत व्यासपीठावरील मान्यवरांनी व्यक्त केले. याच मुद्द्यावर ठराविक जागांवर ताकद दाखवावी, असा निर्धार करण्यात आला.

error: Content is protected !!