Voting on November 6 and 11, results on November 14 : 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान, 14 नोव्हेंबरला निकाल
New Delhi : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी या निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. बिहारमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दोन्ही टप्प्यांतील मतमोजणी 14 नोव्हेंबर रोजी केली जाणार आहे.
बिहारमध्ये एकूण 7 कोटी 42 लाख मतदार आहेत. त्यापैकी 3 कोटी 92 लाख पुरुष, 3 कोटी 50 लाख महिला आणि 14 लाख नव्या मतदारांचा समावेश आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सुमारे 1,200 मतदारांची व्यवस्था केली जाणार आहे.
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की मतदानाच्या 10 दिवस आधीपर्यंत नावे नोंदवता येतील. एसआयआरच्या माध्यमातून अंतिम मतदार यादी 30 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असून सर्व अधिकारी निष्पक्षपणे काम करतील.
Sonam Wangchuk : सोनम वांगचूक यांच्यासाठी नागपुरात पेटल्या मशाली !
फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच सर्व मतदान केंद्रांवर हिंसाचारावर शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले जाईल. वृद्ध आणि अपंग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर आणि सहाय्यक कर्मचारी उपलब्ध असतील. सर्व मतदान केंद्रांवरील निवडणूक प्रक्रिया थेट प्रक्षेपित करण्यात येईल.
Sub-Registrar Office : बावनकुळेंची दुय्यम निबंधक कार्यालयात धडक, उपराजधानीत खळबळ !
ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की बिहारमधील निवडणुका शांततेत, निष्पक्षपणे आणि आधुनिक पद्धतीने पार पडतील. आयोगाच्या सर्व यंत्रणा सज्ज आहेत आणि बिहारच्या जनतेचे सहकार्य आम्ही अपेक्षित करतो.
___








