Bihar election results : बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमारच आघाडीवर

NDA gets huge majority in early elections : सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएला प्रचंड बहुमत

Patna : बिहार विधानसभा निवडणुकांच्या सुरुवातीच्या निकालांमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा ताकद दाखवत असून, जनता दल युनायटेड राज्यात सर्वाधिक आघाडी घेताना दिसत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पिछाडीवर दिसणाऱ्या जेडीयूने आता मोठी झेप घेत भाजपच्या तोडीस तोड कामगिरी केली आहे. त्यामुळे “अब चौथी बार नितीश सरकार” हे वाक्य प्रत्यक्षात उतरतानाचं चित्र उमटत आहे.

बिहारचं राजकारण गेल्या दोन दशकांपासून नितीश कुमार यांच्या भोवती फिरत आहे आणि या निवडणुकीतही मतदारांनी त्यांच्यावरच मोठा विश्वास दाखवला आहे. 243 जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत एनडीए 156 जागांवर आघाडीवर आहे, तर महाआघाडी 81 जागांवर मर्यादित आहे. यामध्ये जेडीयू 70 जागांवर, भाजप 70 जागांवर आणि आरजेडी 51 जागांवर आघाडीवर आहे. आकड्यांवरून एनडीएच्या विजयाचं चित्र स्पष्ट होत असून, नितीश कुमार हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरू आहे.

Local Body Elections : नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून खामगावमध्ये सर्वेक्षण सुरू!

या निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी जेडीयूचा पत्ता साफ होईल असा दावा केला होता, तर राज्यात भाजपचं मुख्यमंत्रीपद येईल अशी जोरदार चर्चा रंगली होती. पण मतदारांनी दोन्ही दावे फोल ठरवत पुन्हा एकदा नितीश कुमार आणि त्यांच्या पक्षाला मोठी पसंती दिली आहे. तब्येतीच्या अडचणी असूनही नितीश कुमार यांनी केलेली ही चमकदार पुनरागमनाची नोंद विशेष मानली जात आहे.

निवडणूक आयोगाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार सकाळी 10.15 वाजेपर्यंत 219 मतदारसंघांचे कल समोर आले आहेत. त्यामध्ये जेडीयू आघाडीवर असून भाजपही परफॉर्मन्स राखून आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाचा दावा असलेल्या भाजपचे राजकीय गणित नितीश कुमार यांच्या मजबूत कामगिरीमुळे विस्कळीत झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.

एक्झिट पोलमध्ये भाजप बिहारमध्ये मोठी झेप घेईल असं दिसत होतं. काहींनी तर भाजपकडे मुख्यमंत्रीपद आपोआप येईल असा दावा केला होता. परंतु प्रत्यक्ष मतमोजणीने हे सर्व समीकरणे बदलली आहेत. एनडीएला मिळालेल्या निर्णायक आघाडीत जेडीयूची मोठी भूमिका असून, भाजपचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न सध्या धूसर झालं आहे.

Local Body Elections : बुलढाण्यात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

बिहारमधील हे निकाल पुन्हा दाखवून देतात की, राज्याची जनता अजूनही नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवते. महाआघाडीच्या प्रचाराला आणि टीकेलाही न जुमानता नितीश कुमार यांनी चौथ्यांदा सत्ता राखण्याचा मार्ग तयार केला आहे.