BJP’s organizational elections : भाजपच्या निर्णयाने पश्चिम विदर्भातील इच्छुकांचा हिरमोड

BJP’s decision has created a stir among aspirants from Western Vidarbha : जिल्हाध्यक्षपदासाठी आजी-माजी आमदार, खासदारांना संधी नाही

Akola भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत. लवकरच नवीन जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्षांच्या नियुक्त होणार आहेत. त्यापूर्वीच भाजपने घेतलेल्या निर्णयाने पश्चिम विदर्भातील अनेकांच्या इच्छांवर पाणी भरले गेले आहे. जिल्हाध्यक्ष पदाची स्वप्न बघणार यांची झोपमोड झाली असून आता नव्या नेतृत्वाला संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांना वेग येत असतानाच पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मोठा निर्णय घेतला असून, आजी-माजी आमदार आणि खासदारांना जिल्हाध्यक्षपदाची संधी दिली जाणार नाही, तसेच किमान २० टक्के जिल्हाध्यक्ष महिला किंवा अनुसूचित जाती-जमातीमधून असावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

Threat to Naib Tehsildar : बच्चू कडू यांच्या माजी पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

मंगळवारी रात्री मुंबईत भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी प्रदेश पदाधिकारी, आमदार आणि जिल्हाध्यक्ष निवडीसाठी नेमण्यात आलेल्या निरीक्षकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी संघटनेच्या आगामी रचनेविषयी महत्त्वाचे दिशानिर्देश दिले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते.

महाराष्ट्रात भाजपचे एकूण ७८ जिल्हे असून, यापैकी किमान १५ जिल्हाध्यक्ष महिला वा अनुसूचित जाती-जमातींमधून असणे बंधनकारक आहे. हा टक्का ३० पर्यंतही जाऊ शकतो, असेही शिवप्रकाश यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक जिल्ह्यातील निरीक्षक स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची भेट घेऊन जिल्हाध्यक्षपदासाठी पसंतीक्रम मागवतील. त्यानुसार सर्वाधिक पसंती मिळालेल्या तीन नावांचे पॅनल तयार करून ते ३० एप्रिलपर्यंत प्रदेशाध्यक्षांकडे सादर करावयाचे आहे. त्यानंतर ५ मेपर्यंत जिल्हाध्यक्षांची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Vidarbha Farmers : चिखली तालुक्यात पीक विमा भरपाईचा खोळंबा; १६ कोटी रुपये अजूनही प्रलंबित

नवीन नियमानुसार, निरीक्षकांनी तयार केलेल्या तीन नावांच्या यादीत किमान एक महिला आणि एक अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवाराचा समावेश असणे बंधनकारक आहे. तसेच जिल्हाध्यक्षपदासाठी उमेदवाराचे वय ४५ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे, अशी अट घालण्यात आली आहे.