mumbai-mahanagar-palika-budget-2026-80952-crore-deposits-withdrawal-projects-details : ८१ हजार कोटींच्या ठेवींपैकी ३६,६२३ कोटी प्रकल्पांसाठी वापरणार !
Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकाचा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यंदाचा अर्थसंकल्प ८०,९५२.५६ कोटी रुपयांचा असून मागील वर्षीच्या ७४,४२७.४१ कोटींच्या तुलनेत ८.७७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. सुमारे ६,५२५ कोटी रुपयांची वाढ असलेला हा सत्ताबदलानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प ठरला आहे.
महापालिकेच्या एकूण ठेवी ८१ हजार ४४९ कोटी ३२ लाख रुपये इतक्या शिल्लक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यापैकी ४४ हजार ८२६ कोटी २३ लाख रुपये बांधील दायित्वांपोटी राखीव असल्यामुळे ते वापरता येणार नाहीत. मात्र उर्वरित ३६ हजार ६२३ कोटी ०९ लाख रुपये विविध पायाभूत आणि विकास प्रकल्पांसाठी वापरण्याचा निर्णय अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आला आहे. यामुळे ठेवी मोडल्या जाणार नाहीत, असा पूर्वी करण्यात आलेला दावा आता वास्तवात उतरत असल्याचे चित्र दिसत आहे.
Chandrapur Municipal Corporation : उद्धव ठाकरे म्हणतात, चंद्रपूरच्या युतीला माझी हरकत नाही
आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे अंदाजपत्र सादर केले. पूल बांधणी आणि दुरुस्तीच्या १०१ प्रकल्पांपैकी २४ पूर्ण झाले असून मार्च २०२६ पर्यंत आणखी २३ कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. २०२६-२७ मध्ये ३१ तर २०२८-२९ मध्ये २३ पूल पूर्ण करण्यात येणार आहेत. नवीन पूल प्रकल्पांसाठी ९,६५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यात कोस्टल रोडच्या सहाव्या टप्प्याचाही समावेश आहे.
वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडसाठी ४ हजार कोटी, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी २,६५० कोटी आणि विविध मनपा रुग्णालयांसाठी १,०६२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सायन, राजावाडी, नायर आणि वांद्रे कर्करोग रुग्णालयांसह इतर आरोग्य संस्थांचा यात समावेश आहे. आरोग्य विभागासाठी एकूण ७,४५६ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.
Ajit Pawar plane accident : पोलीस ठाण्यात तणाव; रोहित पवार, अमोल मिटकरी यांची पोलिसांशी बाचाबाची !
मिठी नदी प्रकल्पासाठी २८६.२५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. स्मार्ट वाहनतळ उभारणीसाठी पीपीपी तत्त्वावर ऑन-स्ट्रीट आणि ऑफ-स्ट्रीट पार्किंग प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यासाठी ६,८७५ कोटींची तरतूद आहे. कोस्टल रोडलगत ५३ हेक्टर क्षेत्रावर हरित पट्टा आणि उद्यान विकासासाठी ९५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
बेस्ट उपक्रमासाठी १,००० कोटींचे अनुदान प्रस्तावित असून २०१२-१३ पासून जानेवारी २०२६ पर्यंत महापालिकेने १२,०२८.८१ कोटींची आर्थिक मदत दिल्याची नोंद करण्यात आली आहे. ग्रीन बॉन्ड्सद्वारे निधी उभारणीचा निर्णय घेण्यात आला असून १,००० कोटींच्या निर्गमासाठी केंद्राकडून १०० कोटींचे अनुदान मिळणार आहे.
Devendra fadnavis : आर्थिक शिस्तीचा पहिला निर्णय; देवेंद्र फडणवीस यांची पुरवणी मागण्यांवर कात्री
फेरीवाल्यांना QR कोड आधारित प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अधिकृत फेरीवाल्यांची ओळख स्पष्ट करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असून अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबरनंतर करमणूक करावरील सवलत संपुष्टात येणार असून ऑक्टोबरपासून करमणूक कर वसूल करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.
यंदाचा अर्थसंकल्प मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा, आरोग्य, वाहतूक आणि पर्यावरणीय प्रकल्पांवर केंद्रित असून ठेवींचा वापर करून विकासाला चालना देण्याचा स्पष्ट प्रयत्न करण्यात आला आहे. आगामी काळात या तरतुदींची अंमलबजावणी कितपत प्रभावी ठरते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
____








