BMC elections : भाजपचे बहुचर्चित उमेदवार नवनाथ बन विजयी

BJP Candidate Navnath Ban registered win : आधीपासून चर्चेत, स्थानिक प्रश्नांवर भर

Mumbai महा पालिका निवडणुकांची मतमोजणी सुरु झालेली आहे आणि विशेषतः सोन्याची कोंबडी म्हणून जिचा उल्लेख राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात केला जातो त्या बीएमसी निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच भाजपचे बहुचर्चित उमेदवार नवनाथ बन यांनी निवडणुकीत विजय मिळवत राजकीय वर्तुळात लक्ष वेधून घेतले आहे. मतमोजणीच्या निकालात नवनाथ बन यांचे नाव आघाडीवर राहिल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भाजपसाठी हा विजय महत्त्वाचा मानला जात असून, स्थानिक राजकारणात पक्षाची ताकद पुन्हा अधोरेखित झाल्याचे चित्र आहे.

नवनाथ बन हे निवडणुकीपूर्वीपासूनच चर्चेत होते. प्रचाराच्या काळात त्यांनी स्थानिक प्रश्नांवर भर देत विकास, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांबाबत ठोस भूमिका मांडली होती. तसेच विरोधकांवरही त्यांनी शरसंधान केले होते. अतिशय सामान्य घरातले म्हणून त्यांची चर्चा या निवडणुकीत होत होती. प्रचारादरम्यान त्यांनी विविध भागांमध्ये भेटी देत थेट जनतेशी संवाद साधला होता.

Prakash Ambedkar : कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, प्रकाश आंबेडकरांची भविष्यवाणी!

या निवडणुकीत नवनाथ बन यांना विविध स्तरातून पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले. युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांचा कल त्यांच्या बाजूने असल्याचे मतमोजणीच्या आकडेवारीतून समोर आले. भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा फायदा या विजयाला झाल्याचे सांगण्यात आले. बूथ पातळीवर केलेली आखणी आणि नियोजन यामुळे मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचता आले, असेही मत व्यक्त केले जात आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले निवडणूक प्रक्रियेत क्रांतिकारी बदल आवश्यक

आता मुंबई कोण राखणार आणि ठाकरेंचा सुपडा साफ होईल की काटे की टक्कर देतील हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईलच. मात्र नवनाथ बन यांच्या विजयामुळे एक सामान्य कार्यकर्ताही जिंकू शकतो, हे स्पष्ट झाले आहे.