व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Bogus minority status : नागपुरात बोगस अल्पसंख्याक दर्जा मिळवून शासनाची फसवणूक; शाळा...

Bogus minority status : नागपुरात बोगस अल्पसंख्याक दर्जा मिळवून शासनाची फसवणूक; शाळा संचालकांसह ९ जणांवर गुन्हे दाखल

Fir against 9 including School directors in bogus minority status : बोगस कागदपत्रांचा केला वापर, राज्य अल्पसंख्याक आयोगाने घेतली होती दखल

Nagpur बोगस कागदपत्रांच्या आधारे अल्पसंख्याक दर्जा मिळवून शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नागपुरातील फिरोज गांधी विद्यालय आणि फिरोज विद्या समितीच्या ९ पदाधिकाऱ्यांविरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्तांना सखोल चौकशीचे आदेश दिले होते, ज्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी फिर्यादी मोहम्मद अली आझाद यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कृष्णकुमार केदारनाथ पांडे, दुर्गाप्रसाद आसाराम गुप्ता, धीरज रत्न कृष्णकुमार पांडे, योगेंद्र रामलोचन शुक्ला, हरिभाऊ नामदेवराव किरपाणे, छाया देवी कृष्णकुमार पांडे, अनिलकुमार केदारनाथ पांडे, श्रीमती रितू अनिरुद्ध तिवारी आणि विष्णुकुमार केदारनाथ पांडे यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९, ४२०, ४६८, ४७१ आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Sonali hinge : पुणे पोलिस दलात खळबळ; ‘रील स्टार’ सोनाली हिंगेसह तीन पोलिसांचे निलंबन

 

पोलीस विभागाने केलेल्या तपासात संबंधित संस्थेने बोगस कागदपत्रांच्या आधारे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त केल्याचे निष्पन्न झाले आहे. अल्पसंख्याक दर्जा मिळालेल्या संस्थांना शासनाकडून विशेष सवलती आणि आर्थिक निधी मिळतो. या सवलतींचा गैरफायदा घेण्यासाठी हा बनाव रचण्यात आल्याचे समोर आले असून, या माध्यमातून बोगस नोकरभरती किंवा शासकीय निधीचा अपहार झाला असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Mla land issue : आमदाराच्या मालकीमुळे जिन्याचे काम रखडले, शिंदे सेनेच्या मंत्र्यांची थेट भूमिका !

या कारवाईनंतर प्यारे खान यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, राज्यात बोगस पद्धतीने अल्पसंख्याक दर्जा मिळवणाऱ्या कोणत्याही संस्थेची गय केली जाणार नाही. अशा संस्थांची शोधमोहीम राबवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. या प्रकरणात आता शिक्षण विभागही संयुक्त चौकशी करण्याची शक्यता असून, तसे झाल्यास आणखी मोठे गैरप्रकार उघडकीस येण्याची चिन्हे आहेत.

error: Content is protected !!