Pay Superintendent Nilesh Waghmare absconding, search underway, information from Deputy Commissioner of Police Rahul Madane : अटक झाल्यावर घोटाळ्यासंदर्भात होतील मोठे खुलासे
Nagpur : नागपूर जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणात शिक्षकांचे वेतन अधीक्षक निलेश वाघमारे फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. वाघमारेंना अटक झाल्यानंतर या घोटाळ्यासंदर्भात आणखी मोठे खुलासे होऊ शकतील, अशी माहिती बोगस शिक्षक भरती प्रकरणाच्या तपासासाठी निर्माण केलेल्या एसआयटीचे प्रमुख पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी आज (२४ मे) दिली.
नागपूर विभागाच्या तत्कालीन शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना छत्रपती संभाजी नगरमधून अटक करण्यात आली आहे. वैशाली जामदार यांच्या अटकेनंतर या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या १५ वर पोहोचली आहे. पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार बोगस शिक्षक भरतीचा कारभार सन २०१० पासूनच सुरू होता. तेव्हापासून जवळपास १ हजार शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्याची बाब आतापर्यंतच्या तपासात समोर आली आहे.
Operation Sindoor : स्वतः विदेशात राहणार आणि मोदींना धोरण शिकवणार काय ?
१ हजार नियुक्त्यांपैकी फक्त ३५० नियुक्त्या रीतसर प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आल्या आहेत. तर उर्वरित नियुक्त्यांसंदर्भात योग्य प्रक्रिया न पाळताच शालार्थ आयडी देण्यात आल्या होत्या. त्यामुळे जवळपास ६५० शिक्षकांच्या नियुक्त्या बोगस असण्याची दाट शक्यता आहे. या सर्व ६५० बोगस नियुक्त्यांबद्दल शालार्थ आयडी तयार करून शिक्षकांचे वेतनही सुरू करण्यात आले होते. त्यामुळे बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून शासनाना मोठे आर्थिक नुकसान पोहोचवण्यात आले असल्याची बाब समोर आली आहे. प्राथमिक दृष्या या प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे, असेही एसआयटीचे प्रमुख राहुल मदने यांनी सांगितले.