Breaking

Bribery case : जिल्हा उपनिबंधकाविरुद्ध ७६० पानांचे दोषारोपपत्र

A 760-page charge sheet against the district deputy registrar : डॉ. प्रवीण लोखंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ

Akola सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांच्या विरोधात चार वर्षांपूर्वी लाचखोरीचे प्रकरण दाखल झाले होते. या प्रकरणात अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ७६० पानांचे दोषारोपपत्र सादर केले आहे. या कारवाईमुळे डॉ. लोखंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. लवकरच त्यांची जिल्ह्याबाहेर बदली होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

सन २०२० मध्ये अकोट बाजार समितीतील सचिव व अन्य कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता अपेक्षित होती. त्यासाठी डॉ. लोखंडे यांनी सेठी यांच्यामार्फत पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप होता. तक्रारदाराने ACB कडे तक्रार दाखल केली. त्यानंतर ९ जुलै २०२० रोजी विक्रीकर विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त अमरप्रित सेठी यांच्या माध्यमातून डॉ. लोखंडे दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले. त्या वेळी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले होते.

Cooperative Banks : उच्च न्यायालयाच्या निर्णयाने सहकार क्षेत्रात गोंधळ

डॉ. लोखंडे यांच्यावर २०१८ मध्ये अमरावती जिल्ह्यात कार्यरत होते. त्यावेळी एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. त्या प्रकरणाची सद्यस्थिती स्पष्ट नाही. मात्र, दोन वर्षांनी म्हणजे २०२० मध्ये त्यांना पुन्हा लाचखोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. या घटनेनंतर त्यांच्या विरोधात तक्रारींचा ओघ वाढला होता.

सध्या डॉ. लोखंडे हे त्याच जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यामुळे खटल्यावर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील काही हितसंबंधी व्यक्ती त्यांच्या बदलीची मागणी करत आहेत. हा खटला निष्पक्षपणे चालण्यासाठी त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करावी, अशी मागणी खाजगीत केली जात आहे.

Nitin Gadkari Devendra Fadnavis गडकरी-फडणविसांनी एकमेकांना दिले श्रेय!

सहकार विभागातील काही तक्रारींच्या चौकशीनंतर निकाली काढलेल्या प्रकरणांमध्येही नवीन नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. काही प्रकरणे सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित असताना त्या प्रकरणांनाही नोटिसा पाठवल्या गेल्याने संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित व्यक्ती न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.