Buldhana zilla parishad : बुलढाण्यात जिल्हा परिषदेचे अधिकारी सामूहिक रजेवर

Zilla Parishad officials on collective leave for demanding ordinance : घरकूल व हमी योजनांतील जबाबदारी निश्चितीच्या अध्यादेशाची मागणी

Buldhana : घरकुल योजना आणि हमी (मनरेगा) योजनेतील जबाबदारी स्पष्ट करणारा अध्यादेश तत्काळ जारी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील अधिकाऱ्यांनी सोमवार ८ डिसेंबर रोजी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले. बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत सर्व अधिकारी या आंदोलनात सहभागी झाल्याने दैनंदिन कामकाज आणि विभागीय प्रस्ताव स्वाक्षरीअभावी रखडले आहेत.

घरकुल आणि मनरेगा योजनांमध्ये जबाबदारी निश्चित करण्यासंदर्भात शासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, बुलढाणा यांनी ४ आणि ५ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्रशासनाला सामूहिक रजेबाबत लेखी निवेदन दिले होते.

Dalvi Cash Video : दानवेंना खासदार सुनील तटकरेंनीच व्हिडीओ पाठवला !

तथापि, शासनाकडून अद्याप कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्याने आजपासून जिल्हा परिषदेचे अधिकारी सामूहिक रजेवर गेले आहेत.
संघटनेने स्पष्ट केले आहे की शासनस्तरावर त्यांच्या न्याय्य मागण्यांवर निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. अधिकारी वर्गाने घेतलेला हा भूमिकात्मक आणि आक्रमक पवित्रा लक्षवेधी ठरत आहे.