CAT stops transfer of police superintendent Vishwa Pansare : कॅटचे ताशेरे; विश्व पानसरे यांच्या बदली आदेशाला स्टे
Buldhana बुलढाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांची अमरावती एसआरपीएफ गट क्रमांक ९ येथे केलेली बदली केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणाने (CAT) थांबवली आहे. ही बदली म्हणजे मनमानी कारभार आहे, या शब्दांत कॅटने ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे राजकीय दबावातून ही मध्यावधी बदली झाली का? असा सवाल आता उपस्थित होतोय.
२२ मे २०२५ रोजीच बदली आदेश निघाल्यानंतर तातडीने दाखल याचिकेवर न्यायमूर्ती रंजित मोरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पानसरे यांच्या वकिलांनी VC द्वारे युक्तिवाद केला.
Bogus teacher recruitment scam : वेतन अधीक्षक निलेश वाघमारे फरार, शोध सुरू
पानसरे यांनी ३१ ऑगस्ट २०२४ रोजीच बुलढाणा जिल्ह्यातील एसपी म्हणून पदभार स्वीकारला होता. महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार दोन वर्षांपूर्वी बदली टाळावी लागते, असा मुद्दा युक्तिवादात मांडण्यात आला. बदली आदेशात कोणतेही कारण नमूद न केल्यामुळे आदेशाला “मध्यावधी व मनमानी” स्वरूप असल्याची टिप्पणीही न्यायाधिकरणाकडून आली आहे.
या बदलीबाबत राजकीय वर्तुळातही कुजबूज सुरु आहे. काही विशिष्ट कारवायांमुळे किंवा स्थानिक राजकीय ताकदींवर परिणाम झाल्यामुळेच ही घाईने केलेली बदली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. ‘कोणती आपत्कालीन गरज होती?’ असा सवाल न्यायाधिकरणाने केला आहे.
जिल्ह्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसतानाही तातडीचा निर्णय आदेशात कारणांचा स्पष्ट उल्लेख नाही. या तिन्ही मुद्द्यांवरून न्यायालयीन पातळीवर सरकारची अडचण वाढू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
Operation Sindoor : स्वतः विदेशात राहणार आणि मोदींना धोरण शिकवणार काय ?
दुसरीकडे, २०१८ बॅचचे आयपीएस अधिकारी नीलेश तांबे यांनी २२ मे रोजीच रात्री पदभार स्वीकारला. ‘गुन्हे अन्वेषण व धोरणात्मक व्यवस्थापनात तज्ज्ञ’ असलेल्या तांबेंच्या नियुक्तीमागे विशेष राजकीय संदेश आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.